25 February 2021

News Flash

काँग्रेस प्रदेशाध्याक्षांच्या रॅलीमुळे रुग्णवाहिका खोळंबली, ७ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

काँग्रेस प्रदेशाध्याक्षांच्या रॅलीमुळे झालेलेल्या वाहतुक कोंडीत रूग्णवाहिका अडकली

प्रातिनिधीक छायाचित्र

हरियाणातील काँग्रेस प्रदेशाध्याक्षांच्या सायकल रॅलीमुळे झालेलेल्या वाहतुक कोंडीत रूग्णवाहिका अडकली. त्यामुळे आतमध्ये असलेल्या सात महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हरियाणातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डॉ. अशोक तंवर यांच्या नेतृत्वाखाली सोनीपत येथे मंगळवारी सायकल रॅली काढण्यात आली होती. तंवर यांच्या रॅलीमुळे तिथे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. वाहतुककोंडीमुळे रूग्णवाहिकेला रस्ता मिळाला नाही. वाहतुकीकोंडीमध्ये अडकलेल्या रुग्णवाहिकेतून सात महिन्यांच्या या बाळाला तातडीच्या उपचारांसाठी रुग्णालयात नेले जात होते. पण रस्ता न मिळाल्यामुळे सात महिन्याच्या बाळाचा रूग्णवाहिकेतच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच तंवर यांच्या सायकल रॅलीवर टीका केली जात आहे.

काँग्रेस पक्षाच्या सायकल रॅलीमुळे रूग्णवाहिका ४५ मिनीटे वाहतूक कोंडीत अडकली. पुढील उपचारासाठी डॉक्टरांनी आम्हाला सोनीपत येथील रूग्णालयात जाण्यास सांगितले होते. रूग्णवाहिकेत ऑक्सिजनची व्यवस्था नव्हती. अशी माहिती बाळाच्या पित्याने दिली.

दुसरीकडे या दुःखद घटनेला तंवर यांनी पोलिस व प्रशासनाला दोषी ठरविले आहे. ‘आमच्या कार्यकर्त्यांना जेव्हा रुग्णवाहिका वाहतुकीत अडकल्याचे समजले तेव्हा त्यांनी जागा करून दिली. सरकार, स्थानिक प्रशासन व पोलिसांनी याची जबाबदारी घ्यायला हवी,’ असे तंवर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

असे हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी या संदर्भात रोहतक पोलिस अधीक्षकांना तपासाचे आदेश दिले आहेत. तसेच याप्रकरणी एफआयआर दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 24, 2018 11:32 am

Web Title: infant died during cycle rally of congress leader ashok tanwar sit formed to probe into matter
Next Stories
1 जम्मू- काश्मीरमध्ये चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान
2 भारतातील जिहादसाठी पाकमध्ये ‘जैश’चे दहशतवादी गोळा करतायंत पैसे
3 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
Just Now!
X