लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर अशाप्रकारे निशाणा साधला की लोकसभेत विरोधकांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. उलटा चोर चौकीदार को डाँटे असे म्हणत त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. तर महागाईवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन गाण्यांची उदाहरणं दिली आहेत.

‘बाकी कुछ बचा नहीं महंगाई मार गयी’, ‘महंगाई डायन खायें जात है’ ही दोन गाणी कोणाच्या कार्यकाळात प्रसिद्ध झाली? माझ्यावर टीका करणाऱ्यांनी जरा याचा विचार करावा. इंदिरा गांधी यांचे राज्य असताना बाकी कुछ बचा नहीं महंगाई मार गयी हे गाणं आलं होतं प्रसिद्ध झालं होतं. तर दुसरे गाणं महंगाई डायन खायें जात है यूपीएच्या रिमोट कंट्रोल सरकारमध्ये आलं होतं आणि प्रसिद्ध झालं होतं. महागाई आणि काँग्रेस यांचं अत्यंत जवळचं नातं आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

हे सरकार पारदर्शक म्हणून ओळखलं जातं. गरिबांसाठी झटणांर, राष्ट्रहिताला प्राथमिकता देणार, भ्रष्टाचारावर कारवाई करणारं तसंच वेगाने काम करणारं म्हणून ओळखलं जातं असं यावेळी नरेंद्र मोदींनी सांगितलं. संसदेत चर्चेचा प्रयत्न झाला आहे. काही टीकादेखील झाली…काहीजणांनी जे आवडतं ते वारंवार बोलून दाखवलं. निवडणूक असल्याने काही ना काहीतरी बोलावं लागतंच. नाईलाज असणं साहजिक आहे असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.