नोटाबंदीमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिजम कॉर्पोरशन (आयआरसीटीसी) ने दिलासा दिला आहे. येत्या ३१ डिसेंबरपर्यंत ई-तिकिट आणि आय- तिकिटांच्या बुकिंगवर सेवा शूल्क (सर्व्हिस चार्ज) लागणार नाही. रोखविरहीत व्यवहारांना चालना मिळावी म्हणून आयआरसीटीसीने हे पाऊल उचलले आहे.
सध्या द्वितीय श्रेणी ई-तिकिटावर २० रूपये तर आय-तिकिटावर ८० रूपये सेवा शूल्क आकारला जातो. उच्च श्रेणीचे तिकिट बुक केल्यास ई-तिकिटावर ४० रूपये तर आय-तिकिटावर १२० रूपये सेवा शूल्क द्यावा लागतो. परंतु नव्या निर्णयामुळे येत्या ३१ डिसेंबरपर्यंत सेवा शूल्क माफ करण्यात आला आहे. त्यामुळे नियमित रेल्वे प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.