गुजरात उच्च न्यायालयाचे आदेश
गुजरातमधील २००४ च्या इशरत जहॉं बनावट चकमक प्रकरणात आयपीएस अधिकारी डी़  जी़ वंझारा यांना अटक करण्याची अनुमती मंगळवारी विशेष सीबीआय न्यायालयाने सीबीआयला दिली़
वंझारा २००५ साली सोहराबुद्दीन शेख याचे बनावट चकमक प्रकरण आणि त्याची पत्नी कौसार बी हिच्या हत्येच्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत़  इशरत जहाँ प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केल्याने मुंबई न्यायालयाने सोमवारी वंझारा यांना कडक सुरक्षा व्यवस्थेत अहमदाबाद तुरुंगात हलविण्याचे आदेश दिले होत़े
त्यानंतर मंगळवारी जहॉं प्रकरणातील तपास अधिकारी आणि सीबीआयचे पोलीस उपअधीक्षक जी़  कलईमानी यांनी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस़ एच़ खुतवाद यांच्याकडे वंझारा यांना अटक करण्याची परवानगी मागितली होती़
वंझारा यांच्या अटकेची परवानगी देतानाच न्यायालयाने कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे तसेच आरोपीला घरचे जेवण घेऊ देण्याचेही आदेश दिले आहेत़  अटकेनंतर २४ तासांच्या अवधीत वंझारा यांना न्यायालयासमोर उपस्थित करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आह़े  या प्रकरणातील आणखी एका बडा आरोपी, गुजरातचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (गुन्हे) पी़ पी़ पांडे हे फरारी असून त्यांच्याविरुद्ध सीबीआयने अटक वॉरंट काढले आह़े