News Flash

पंतप्रधान मोदी हे इस्लामविरोधी, आयसिसचा दावा

व्लादिमीर पुतीन, बराक ओबामा, पोप फ्रान्सिस हे देखील इस्लामविरोधी असल्याचे आयसिसने म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी, बराक ओबामा, पोप फ्रान्सिस हे सर्व इस्लामविरोधी असल्याचे आयसिसने म्हटले

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्लामविरोधी कारवाया करीत आहेत असा आरोप दहशतवादी संघटना आयसिसने केला आहे. आयसिसने १९ मिनिटांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.  त्यांच्यामते, इस्लामविरोधात कोणता नेता काम करीत आहे असे या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. पंतप्रधान मोदींव्यतिरिक्त व्लादिमीर पुतीन, बराक ओबामा, पोप फ्रान्सिस, तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप इर्डोगन हे देखील इस्लामविरोधी असल्याचे आयसिसने म्हटले आहे.

इस्तंबूलमध्ये रविवारी एका नाइटक्लबवर हल्ला झाला. त्या हल्ल्यामध्ये ३९ जण ठार झाले आहेत. हा हल्ला होण्याच्या आधी आयसिसने हा व्हिडिओ इंटरनेटवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्डोगन यांच्याविरोधात टीका करण्यात आली आहे. तुर्कीने सिरियामध्ये चाललेल्या युद्धामध्ये हस्तक्षेप करणे अनावश्यक होते असे या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष हस्तांदोलन करताना दिसत आहेत. जी-२० शिखर परिषदेच्या वेळी घेण्यात आलेला हा फोटो आहे.

या व्हिडिओच्या शेवटी तुर्कीच्या दोन सैनिकांना जिवंत जाळण्यात आल्याचे दाखवले गेले आहे. या आधी एर्डोगन हे विश्वासघातकी आहेत असा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. तुर्कीमध्ये झालेल्या हल्ल्याची जबाबदारी आयसिसने घेतली आहे. सोशल मीडियावर आयसिसने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की खिलाफतच्या सैनिकांनी रैना नाइट क्लब येथे हल्ला घडवून आणला. मध्य आशियातील आयसिस शाखेने ही जबाबदारी घेतल्याचे सूचित होत आहे.

दैनिक हुर्रियतने म्हटले आहे, की तुर्की पोलीस व गुप्तचरांना जी माहिती मिळाली आहे, त्यानुसार काही शहरांमध्ये असे हल्ले होणार असल्याची कल्पना होती. डिसेंबरमध्ये पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकून काही जणांना अटक केली होती, त्यात काही माहिती हाती आली.

यातील हल्लेखोर अजून बेपत्ता असून तो आयसिसशी संबंधित आहे व तो किरगिझस्तान किंवा उझबेकिस्तानचा असावा. जूनमध्ये इस्तंबूलच्या अतातुर्क विमानतळावर हल्ले करणाऱ्या गटातीलच एकाने हा हल्ला केला असावा असे सांगण्यात येते. त्या हल्ल्यात ४७ जण मरण पावले होते. हुíरयतचा स्तंभलेखक अब्दुलकादीर सेल्वी याने लिहिले आहे, की ३० डिसेंबरला तुर्कस्तानला अमेरिकेकडूनही गुप्तचर माहिती मिळाली होती, त्यात इस्तंबूल व अंकारा येथे नववर्षदिनी हल्ल्याची शक्यता वर्तवली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 2:43 pm

Web Title: isis attack istanbul turkey narendra modi isis erdogen barack obama
Next Stories
1 प्रवासी यादी जाहीर झाल्यानंतर शिल्लक आसनांवर रेल्वेकडून १०% सवलत
2 भविष्यात विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रावर भारताचाच दबदबा असेल- पंतप्रधान मोदी
3 ‘यम’ बनून लोकांच्या मागे लागू नका!; नोटाबंदीवरून मायावतींचा मोदींवर हल्लाबोल
Just Now!
X