News Flash

ISIS: ‘आयसिस’चा भारतातील म्होरक्या मोहम्मद शफी सीरियात ठार

शफी हा युसूफ या नावाने सुद्धा ओळखला जायचा.

संग्रहित छायाचित्र

ISIS आयसिस या दहशतवादी संघटनेत भारतातून तरुणांना भरती करण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेला मोहम्मद शफी अरमार अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात काही दिवसांपूर्वी मारला गेला. अमेरिकी ड्रोन विमानांनी सीरियामध्ये केलेल्या कारवाईत शफी मारला गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. शफी हा युसूफ या नावाने सुद्धा ओळखला जायचा.
‘आयसिस’च्या म्होरक्या अबु बक्र अल बगदादी याचा निकटवर्तीय म्हणून शफी ओळखला जात होता. त्याच्याकडे संघटनेसाठी भारतातून तरुणांना आणण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्याने सुमारे ३० तरुणांना भरती केल्याची माहितीही मिळाली होती. ‘आयसिस’मध्ये सहभागी होण्यासाठी सीरियाकडे निघालेल्या तरुणांना ‘एनआयए’सह देशातील विविध राज्यांतील पोलीस अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतातील प्रत्येक राज्यामध्ये ‘आयसिस’चे केंद्र सुरू करण्याची योजना शफीने आखली होती. शफी हा मुळचा कर्नाटकातील भटकळचा राहणारा होता. त्याचा मोठा भाऊ सुलतान अरमार हा देखील गेल्यावर्षी मार्च महिन्यात याच पद्धतीने मारला गेला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2016 12:20 pm

Web Title: isis chief india recruiter killed in us drone strike
टॅग : Isis,Islamic State
Next Stories
1 भ्रष्टाचाराला आळा कसा घालायचा हे सोनियांकडून शिका- मेनका गांधी
2 अविश्वासू भाजप नेत्यांना निवडणुकीवेळी दारासमोर उभेही करू नका, संघाच्या नेत्याने सुनावले
3 बॉम्ब कसा बनवाल?; भारतीय सदस्यांना ‘आयसिस’च्या ऑनलाईन टिप्स
Just Now!
X