13 August 2020

News Flash

पाकिस्तानकडून इसिसला अण्वस्त्रांची विक्री ?

इसिसने पाकिस्तानकडून वर्षभरात अण्वस्त्र विकत घेण्याचे ठरवले आहे, ते आमच्या ताब्यात आल्यास त्यात आश्चर्य वाटणार नाही, इतकी आमची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे, असा दावा संघटनेच्या

| May 24, 2015 05:49 am

इसिसने पाकिस्तानकडून वर्षभरात अण्वस्त्र विकत घेण्याचे ठरवले आहे, ते आमच्या ताब्यात आल्यास त्यात आश्चर्य वाटणार नाही, इतकी आमची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे, असा दावा संघटनेच्या ‘दबिक’ या प्रचार मासिकात करण्य़ात आला आहे. या संघटनेच्या हाती अण्वस्त्रे पडली तर जगासाठी ती धोकादायक बाब ठरणार आहे.
इसिसने आता आधुनिक जगातील सर्वात स्फोटक जिहादी गट म्हणून मान्यता मिळवली आहे व केवळ १२  महिन्यांतच तो आणखी स्फोटक होईल. छायाचित्रपत्रकार कँटली यांना या गटाने ओलिस ठेवले  आहे.  ते अनेक व्हिडिओंमध्ये दिसतात व त्या व्हिडिओ यू टय़ूबवर आहेत. त्या मालिकेचे नाव ‘लेंड मी युवर इयर्स’ असे आहे.
परफेक्ट स्टॉर्म या लेखात म्हटले आहे की, बोको हरमसारख्या इस्लामी गटांनी इसिसशी दोस्ती केली आहे व मध्य पूर्व, आफ्रिका, आशियात संघटनेला बळकट केले आहे. अमेरिका व इराणचे रणगाडे, अग्निबाण प्रक्षेपक व क्षेपणास्त्र प्रणाली व विमान विरोधी यंत्रणा ताब्यात घेतल्या आहेत. सध्या इसिसकडे अण्वस्त्रे नाहीत, पण ती मिळवण्याचा प्रयत्न चालला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2015 5:49 am

Web Title: isis claims it could buy its first nuclear weapon from pakistan within a year
टॅग Isis,Pakistan
Next Stories
1 समलैंगिक विवाहाच्या वैधतेकडे आर्यलडचा कल
2 अमेरिकेतील भारतीय वंशाचा मुलगा अकराव्या वर्षी पदवीधर
3 काँग्रेसचे राष्ट्रपतींना निवेदन
Just Now!
X