News Flash

डिझायनर बुरखा घालणे इस्लामविरोधी

दारुल उलूमचा फतवा

| January 5, 2018 02:22 am

दारुल उलूमचा फतवा

डिझायनर आणि अंगात घट्ट बसेल असा (स्लिम फिट) बुरखा घातल्यामुळे पाहणाऱ्याचे लक्ष वेधले जात असल्याने अशा प्रकारचा बुरखा घालणे हे इस्लामविरोधी आहे, असे इस्लामी विचारसरणीची प्रख्यात पाठशाळा असलेल्या दारुल उलूम देवबंदने जारी केलेल्या फतव्यात म्हटले आहे.

निरनिराळे प्रकार, रंग आणि डिझाइन्स यातील बुरख्यांना इस्लाममध्ये परवानगी नसल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे. ‘हिजाब’ च्या (बुरखा) नावावर डिझायनर व स्लिम फिट बुरखा वापरणे निषिद्ध असून इस्लाममध्ये त्याला संपूर्ण मनाई आहे, असे या फतव्यात नमूद केले आहे.

अनेकदा अंगात घट्ट बसत असल्याने पुरुषांचे लक्ष वेधन घेणारे डिझायनर बुरखे इस्लामला मान्य आहेत काय, अशी विचारणा एका इसमाने मुफ्तींना केली होती, त्याच्या उत्तरात देवबंदने हे स्पष्टीकरण दिले आहे. आशियातील इस्लामच्या सगळ्यात मोठय़ा आणि प्रख्यात पाठशाळांपैकी एक असलेले दारुल उलूम हे उत्तर प्रदेशच्या सहारणपूर जिल्ह्य़ातील देवबंद येथे आहे. अलीकडेच त्यांनी नववर्ष स्वागत समारंभ इस्लामविरोधी असल्याचे सांगून त्याच्या विरोधात फतवा जारी केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2018 2:22 am

Web Title: islamic seminary darul uloom issues fatwa against designer burqas
Next Stories
1 निर्वाह भत्त्यावरून काँग्रेसने तलाक विधेयक रोखले
2 कुलभूषण यांचा बेतीव व्हिडीओ पाकिस्तानतर्फे जारी
3 अमेरिकेच्या कोणत्याही दंडात्मक कारवाईला प्रत्युत्तर देण्यास सज्ज
Just Now!
X