शत्रूच्या प्रदेशातील माहिती गोळा करण्याबरोबर टार्गेटसवर हल्ला करण्यासाठी ड्रोन विमानांचा वापर केला जातो. या ड्रोन विमानांच्या बाबतीत इस्रायलने भन्नाट टेक्नॉलॉजी विकसित केली आहे. या टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने शत्रूने पाठवलेल्या ड्रोन विमानावर पूर्णपणे नियंत्रण मिळवता येते. इस्रायलमधल्या एका डिफेन्स टेक्नॉलॉजी कंपनीने डब्ड स्कायलॉक हे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

या टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने ऑपरेटर शत्रूच्या ड्रोन विमानाचे लँडिंग करुन आवश्यक विश्लेषणही करु शकतो. ठराविक अंतरावर असताना शत्रूचे ड्रोन विमान आम्ही हेरतो. डब्ड स्कायलॉकच्या सहाय्याने एकाचवेळी २०० ड्रोन विमानांवर नियंत्रण मिळवता येते असे स्कायलॉक स्टेटसचे प्रोडक्ट मॅनेजर असफ लेबोवित्झ यांनी सांगितले.

दोन महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमात स्कायलॉकने या टेक्नॉलॉजीचे सादरीकरण केले. ड्रोनवर नियंत्रण मिळवण्यासाठी आम्ही एका जागा निश्चित केली. ड्रोन विमान आणि ऑपरेटरमधल्या संपर्कात अडथळा आणून ड्रोनवर नियंत्रण मिळवतो. त्यानंतर ड्रोनचे लँडिंग करुन कुठली शस्त्रास्त्रे त्यामध्ये आहेत आणि अन्य माहिती मिळवता येते अशी लेबोवित्झ यांनी सांगितले. राफेल कंपनीने सुद्धा ड्रोन विरोधी तंत्रज्ञान विकसित केले आहे. या टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने सुद्धा शस्त्रसज्ज मानवरहित विमानावर नियंत्रण मिळवून लँडिंग करता येते.