गाझा सिटी : इस्राएल व पॅलेस्टाइन यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिकाधिक चिघळत चालला आहे. हमासने इस्राएलवर गुरुवारी रॉकेट हल्ले केले तर इस्राएलने गाझावर जोरदार हवाई हल्ले करून त्याला प्रत्युत्तर दिल्याचे वृत्त आहे.

इजिप्तने दोन्ही बाजूंशी चर्चा करून या संघर्षात मध्यस्थीचे प्रयत्न सुरू केले असले तरीही इस्रााएल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील वैरभाव वाढतच चालला आहे. काही रॉकेट््स तेल अवीववर डागण्यात आल्यानंतर अरब आणि ज्यू जमावाने रस्त्यावर उतरून हिंसाचार घडविला. विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली वा त्यांचे मार्ग देशाच्या मुख्य विमानतळावरून अन्यत्र वळविण्यात आले आहेत. इस्राएलच्या हल्ल्यात हमासचे प्राबल्य असलेल्या तीन गगनचुंबी इमारती जमीनदोस्त झाल्या. हल्ल्यात पॅलेस्टाइनचे ८३ नागरिक ठार झाल्याचे आणि ४८०हून अधिक जण जखमी झाल्याचे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.