08 March 2021

News Flash

दिशादर्शन प्रणालीतील उपग्रह १५ मार्चला सोडणार

इस्रोला गेले वर्ष मंगळ मोहिमेच्या यशामुळे चांगले गेले असून, यंदाच्या वर्षी आयआरएनएसएस १ डी हा पहिला उपग्रह १५ मार्चला अवकाशात सोडण्यात येणार आहे.

| January 7, 2015 12:35 pm

इस्रोला गेले वर्ष मंगळ मोहिमेच्या यशामुळे चांगले गेले असून, यंदाच्या वर्षी आयआरएनएसएस १ डी हा पहिला उपग्रह १५ मार्चला अवकाशात सोडण्यात येणार आहे.
भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की अमेरिकेच्या ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीमच्या (जीपीएस) बरोबरीने काम करणारी प्रणाली भारतही तयार करीत असून, त्यातील हा तिसरा दिशादर्शक उपग्रह तयार करण्यात येणार असून, त्याची तयारी १६ जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. त्याचे सुटे भाग इस्रोच्या प्रयोगशाळांकडून श्रीहरिकोटा येथे दोन महिन्यांत आणले जातील व दोन महिन्यांत त्याचे उड्डाण होईल असे सांगण्यात आले.
आयआरएनएसएस १ डी इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीममधील चौथा उपग्रह आहे. दिशादर्शक प्रणालीसाठी चार उपग्रह पुरेसे असतात, पण भारत एकूण सात उपग्रह सोडणार आहे. आयआरएनएसएस १ इ व आयआरएनएसएस १ एफ हे उपग्रह वर्षअखेरीपर्यंत सोडले जातील. आयआरएनएसएस मालिकेतील पहिले तीन उपग्रह १ जुलै २०१३, ४ एप्रिल २०१३ व १६ ऑक्टोबर २०१३ रोजी सोडण्यात आले होते. आयआरएनएसएस प्रणाली तीन ते चार उपग्रहांच्या साहाय्याने सुरू करण्यात येईल व हे उपग्रह भूस्थिर उपग्रह प्रकारातील असतील.

आयआरएनएसएस प्रणालीचे उपयोग
* प्रमाणित स्थाननिश्चिती सेवा.
* अधिकृत उपयोगकर्त्यांनाच सेवा मिळणार.
* एकूण खर्च १४२० कोटी.
इतर देशांच्या प्रणाली
* ग्लोबल ऑरबायटिंग नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टीम (ग्लोनास-रशिया)
* ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस- अमेरिका)
* जीएनएसएस (गॅलिलिओ- युरोपीय समुदाय)
* बैदाऊ उपग्रह दिशादर्शन प्रणाली (बैदाऊ-चीन)
* क्वाझी झेनिथ सॅटेलाइट सिस्टीम (मिशिबेकी-जपान)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2015 12:35 pm

Web Title: isro gears up for irnss 1d navigational satellite launch on 15th march
टॅग : Isro
Next Stories
1 ‘ग्रामीण उद्योजक, बचतगटांच्या उत्पादनांची विक्री रेल्वेमध्ये शक्य’
2 नीती आयोगाच्या ‘सीईओ’पदी सिंधुश्री खुल्लर यांची नियुक्ती
3 नीती आयोग म्हणजे संघाच्या विचारसरणीचा गट
Just Now!
X