नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंती निमित्त कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेमोरिअल येथे पंतप्रधान मोदी यांची प्रमुख उपस्थिती असलेल्या एका कार्यक्रमात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री चांगल्याच भडकल्या व त्यांनी चक्क भाषण करण्यास नकार दिला. उपस्थित नागरिकांमधून ममता बॅनर्जी यांच्या भाषणा अगोदर जय श्रीराम.. असे नारे देण्यात आल्याने, ममता बॅनर्जी संतप्त झाल्याचे दिसून आले.

यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “मला वाटतं की शासकीय कार्यक्रमास काही प्रतिष्ठा असावी. हा शासकीय कार्यक्रम आहे एखाद्या राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही… मी तर पंतप्रधान मोदी व सांस्कृतिक मंत्रालयाची आभारी आहे की, तुम्ही कोलकातामध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले. परंतु एखाद्यास आमंत्रित करून, निमंत्रित करून त्याचा अपमान करणं हे तुम्हाला शोभत नाही. याचा निषेध म्हणून मी इथं काहीच बोलणार नाही. जय हिंद, जय बंगाल..” असं म्हणून त्या भाषणास नकार देत जागेवर जाऊन बसल्या.

या अगोदर एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशाला एक नव्हे, तर चार राजधान्या हव्या अशी मागणी  केली .

फक्त दिल्ली नको, देशाला चार राजधान्या असल्या पाहिजेत, ममता बॅनर्जींची मागणी

“भारताला चार राजधान्या असल्या पाहिजेत असे माझे मत आहे. इंग्रजांनी कोलकात्त्यात बसून संपूर्ण देशावर राज्य केले. मग आपल्या देशात राजधानीचे शहर एकच का?” असा प्रश्न ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला.