करोनाचा प्रादुर्भाव देशात वाढतो आहे. अशा वेळी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणं चुकीचं आहे असं काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. करोनाने सगळ्यांचंच नुकसान केलं आहे.यूजीसी गोंधळ वाढवण्याचं काम करते आहे. युजीसीनेही विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द केल्या पाहिजेत अशी भूमिका राहुल गांधी यांनी घेतली आहे. करोनाने अनेकांचं नुकसान झालं आहे. अशात विद्यार्थ्यांचंही नुकसान झालंय कारण परीक्षा रद्द झाल्या आहेत. मात्र सध्या अशा वातावरणात परीक्षा घेणं योग्य नाही. त्यामुळे यूजीसीने कोणताही गोंधळ न करता वर्षभरात ज्या परीक्षा झाल्या त्यांच्या निकालानुसार विद्यार्थ्यांना पास करावं अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.

करोनाचा प्रादुर्भाव देशभरात वाढतो आहे. अशात अंतिम वर्षांच्या परीक्षांचं काय? हा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र दोन दिवसांपूर्वीच यूजीसीने आरोग्य मंत्रालयाने करोनाबाबत दिलेल्या निर्देशांचं पालन करत परीक्षा घ्यायला हरकत नाही असं म्हटलं होतं. एवढंच नाही तर गुरुवारी यूजीसीने परीक्षांची कार्यपद्धतीही जाहीर केली. . यूजीसीच्या नियमांनुसार अंतिम वर्षाची परीक्षा घेणं गरजेचं आहे, असं केंद्रीय गृह मंत्रलयाचं म्हणणं आहे. त्यामुळे यासंदर्भात यूजीसीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकातही अंतिम वर्षाची परीक्षा घेणं अत्यंत गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान या सगळ्या प्रकरणी महाराष्ट्रातून टीका होताना दिसते आहे.

आणखी वाचा- करोनाचा उद्रेक; देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ

लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी, भवितव्यासाठी परीक्षा रद्द करणे हाच पर्याय योग्य आहे अशी भूमिका महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतली आहे. दरम्यान आज काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही यूजीसीने दिलेल्या सूचना आणि घेतलेल्या भूमिकेवर टीका केली आहे. यूजीसीची भूमिका गोंधळात टाकणारी असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. तसेच करोना काळात परीक्षा घेणं योग्य ठरणार नाही असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे.