जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे जवानांनी जैशच्या कमांडरसह दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरा भागात दहशतवादी दडलेले असल्याची माहिती जवानांना मिळाली होती. ज्यानंतर मंगळवारी दुपारपासून दहशतवाद्यांना शोधण्यासाठी मोहीम राबवली जात होती.

यादरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला, जवानांनी देखील यास चोख प्रत्त्युत्तर दिले, ज्यात जैशचा कमांडर फयाच पंजूचा खात्मा झाला. शिवाय त्याचा एक साथीदार देखील ठार झाला.