सीबीएसीने JEE मुख्य परिक्षेच्या पेपर-१ चा निकाल जाहीर केला असून उमेदवारांना http://www.cbseresults.nic.in या सीबीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन हा निकाल पाहता येणार आहे. पात्र उमेदवार आणि त्यांची रँकही उमेदवारांना येथे पाहता येईल. त्याचबरोबर पेपर-२ चा निकाल उद्या, १ मे रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.


पेपर-१ मध्ये आंध्रप्रदेशचा सुरज कृष्णा भोगी याने अखिल भारतीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला असून के.व्ही.आर. हेमंत कुमार चोडिपिल्ली हा दुसऱ्या स्थानावर आहे. तर, राजस्थानचा पार्थ लातुरीया हा ३५० गुणांसह तीसऱ्या स्थानावर आहे.

JEE main 2018 परिक्षा दिलेल्यांपैकी २ लाख ३१ हजार २४ उमेदवार JEE advanced 2018 परिक्षेसाठी पात्र ठरले आहेत. २०१७ पर्यंत २,२०,००० उमेदवार JEE advanced साठी पात्र ठरले होते. JEE Advanced 2018 ही परिक्षा IITमध्ये प्रवेशासाठी घेतली जाते. JEE advanced 2018 ही परिक्षा २० मे २०१८ रोजी होणार असून त्यासाठी नोंदणी प्रक्रिया २ मे २०१८ पासून सुरु होणार आहे.

यावर्षी सुमारे १०, ४३, ७३९ उमेदवार JEE main 2018 परिक्षेला बसले होते. JEE main ची ऑफलाइन परिक्षा ८ एप्रिल रोजी झाली होती. तर ऑनलाइन परिक्षा १५ आणि १६ एप्रिल रोजी पार पडली होती. देशभरातील ११२ शहरांमध्ये ही परिक्षा घेण्यात आली होती. तर ऑफलाइन परिक्षा १०४ शहरांतील १,६१३ केंद्रांवर घेण्यात आली. इतर देशातील ८ केंद्रांमधूनही ही परिक्षा घेण्यात आली होती.