27 February 2021

News Flash

पंतप्रधान इम्रान खान यांचे पूर्वपत्नी जेमिमा गोल्डस्मिथनी केलं अभिनंदन

इम्रान खान यांच्यावर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून यात पूर्वपत्नी जेमिमा गोल्डस्मिथ यांचाही समावेश

संग्रहित छायाचित्र

इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान बनण्याची शक्यता दिसत असताना जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यामध्ये इम्रान यांची पूर्वाश्रमीची पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ यांचाही समावेश आहे. इम्रान खान यांच्याशी 1995 साली जेमिमा यांनी विवाह केला पण नऊ वर्षांच्या संसारानंतर त्यांचा 2004मध्ये घटस्फोट झाला.

इम्रान खान यांच्या पीटीआय या पक्षाने 119 जागांवर आघाडी घेत सर्वात मोठा पक्ष या स्थानावर मजल मारल्यानंतर जेमिमा यांनी ट्विट करत इम्राम यांचं अभिनंदन केले आहे. 1997 मध्ये इम्रान खान यांनी प्रथम निवडणूक लढवली त्यावेळचा अनुभव जेमिमांनी कथन केला आहे. “मला 1997ची ती पहिली निवडणूक आठवतेय. अनुभव नसलेली, आदर्शवादी व राजकीयदृष्ट्या अत्यंत साधेपणाची… तीन महिन्यांच्या सुलेमानसोबत असताना त्याला देशभर घेऊन फिरले होते. शेवटी फोन आला की एकतर्फी विजय झालाय पण दुसऱ्या पक्षाचा,” जेमिमांनी म्हटलंय. हे ट्विट त्यांनी कारण न देता डिलीट केलं.

जेमिमा व इम्रान खान यांनी घटस्फोटानंतरही सौहार्दाचे संबंध ठेवले आहेत. त्यांना दोन मुलगे आहेत. यानंतर इम्रान यांनी दोन विवाह केले. रेहम खान या इम्रानच्या दुसऱ्या पत्नीने इम्रान यांच्या राजकीय घोडदौडीला थोपवण्याचा प्रयत्न केला तेव्हाही जेमिमा यांनी इम्रान यांना पाठिंबा दिला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2018 4:36 pm

Web Title: jemima goldsmith ex wife congratulates prime minister imran khan
Next Stories
1 ‘थ्री इडियट्स’ फेम सोनम वांगचुक यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर
2 पश्चिम बंगाल नाही ‘बांग्ला’, विधानसभेत नामांतराचा ठराव मंजूर
3 ‘अखंड हिंदुत्त्वासाठी किमान पाच मुलांना जन्म दिला पाहिजे’, भाजपा आमदाराची मुक्ताफळं
Just Now!
X