26 September 2020

News Flash

झारखंडमध्ये मुखपट्टी न वापरल्यास एक लाखापर्यंत दंड

राज्यात आतापर्यंत ६४ लोक करोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत

संग्रहित छायाचित्र

 

करोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, झारखंड मंत्रिमंडळाने बुधवारी झारखंड संसर्गजन्य रोग अध्यादेशाला मंजुरी दिली. यात, सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टी न घालणे, थुंकणे यांसारख्या कोविड-१९च्या प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन न करणाऱ्यांना १ लाख रुपयांपर्यंतचा दंड व २ वर्षांपर्यंतची कैद अशा शिक्षेची तरतूद आहे.

राज्य सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार, झारखंडमध्ये बुधवारी कोविड-१९ ची ४३९ नवी प्रकरणे आढळली आणि आणखी ३ लोकांचा या रोगामुळे मृत्यू ओढवला. राज्यात आतापर्यंत ६४ लोक करोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत, तर करोनाबाधितांची संख्या ६६८२ पर्यंत पोहचली आहे.

कोविडबाबत प्रतिबंधक उपाययोजना न करणाऱ्यांना दंडाची तरतूद करणारे झारखंड हे पहिलेच राज्य नसून, देशातील इतर अनेक राज्यांनी मुखपट्टी न घालणाऱ्यांना दंड ठोठावण्याची तरतूद केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2020 12:19 am

Web Title: jharkhand a fine of up to rs one lakh is imposed for not using a mask abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 लोकसभा, विधानसभेच्या पोटनिवडणुका लांबणीवर
2 देशात उच्चांकी रुग्णवाढ
3 लष्करातील महिला अधिकाऱ्यांना ‘कायम नियुक्ती’
Just Now!
X