22 October 2020

News Flash

चारा घोटाळाप्रकरणी लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर

चारा घोटाळ्यातील देवघर कोषागार प्रकरणी शिक्षेचा अर्धा काळ संपल्याचे कारण सांगत लालू प्रसाद यादव यांच्यावतीने झारखंड हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.

लालू प्रसाद यादव

बिहारचे माजी मुख्यमंत्री, माजी रेल्वे मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना झारखंड हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. चारा घोटाळ्यातील एका देवघर कोषागार प्रकरणात त्यांना हायकोर्टाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. ही दिलासा देणारी गोष्ट असली तरी त्यांना दुसऱ्या एका प्रकरणात जामीन मिळाला नसल्याने तुरुंगातच रहावे लागणार आहे.


चारा घोटाळ्यातील देवघर कोषागार प्रकरणी शिक्षेचा अर्धा काळ संपल्याचे कारण सांगत लालू प्रसाद यादव यांच्यावतीने झारखंड हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने यादव यांना ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

माध्यामांतील वृत्तांनुसार, या सुनावणीदरम्यान कोर्टाने लालू प्रसाद यादव यांना आपला पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, चाईबासा-दुमका कोषागार प्रकरणी त्यांना अद्याप जामीन मिळू शकलेला नाही. त्यामुळे त्यांना तुरुंगातच रहावे लागणार आहे.

दरम्यान, या जामीनामुळे लालू यादव यांच्यासाठी दिलासादायक गोष्ट ही आहे की, ते आपल्या वकीलांमार्फत देवघर कोषागार प्रकरणात मिळालेल्या जामीनाचा आधार घेत दुमका-चाईबासा कोषागार प्रकरणात जामीनासाठी याचिका दाखल करु शकतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2019 3:26 pm

Web Title: jharkhand high court grants bail to rjd leader lalu prasad yadav in the fodder scam case relating to deoghar treasury aau 85
Next Stories
1 बंदुक घेऊन नाचणाऱ्या भाजपा आमदाराची पक्षातून हकालपट्टी
2 प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य विषयावर बोलणाऱ्या पाकिस्तानी नेत्याला पत्रकाराने झापले
3 गरिबांच्या उद्धारात भारत जगात आघाडीवर, UN कडून कौतुक
Just Now!
X