20 October 2020

News Flash

झारखंड: हेमंत सोरेन यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

झारखंडचे राज्यपाल सईद अहमद यांच्या उपस्थितीत आज शनिवार झारखंड मुक्ती मोर्चाच्या(जेएमएम) विधिमंडळ पक्षाचे नेते हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रीमदाची शपथ घेतली. तसेच झारखंडमध्ये लागू असलेली राष्ट्रपती

| July 13, 2013 01:28 am

झारखंडचे राज्यपाल सईद अहमद यांच्या उपस्थितीत आज शनिवार झारखंड मुक्ती मोर्चाच्या(जेएमएम) विधिमंडळ पक्षाचे नेते हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रीमदाची शपथ घेतली. तसेच झारखंडमध्ये लागू असलेली राष्ट्रपती राजवट आज हटविण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती राजवट हटविण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सकाळी साडेनऊ वाजता बिरसा मंडपमध्ये हेमंत सोरेन यांच्या शपथविधीचा कार्यक्रम झाला. सोरेन यांच्याबरोबर काँग्रेसचे नेते राजेंद्रप्रसाद सिंह आणि राष्ट्रीय जनता जलाच्या नेत्या अन्नपूर्णादेवी यांचाही शपथविधी झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2013 1:28 am

Web Title: jharkhand presidents rule revoked hemant soren to take oath as cm
Next Stories
1 पुढील वर्षी नैसर्गिक वायूची दरवाढ अटळ
2 धमक्या येत असल्याची इशरतच्या कुटुंबीयांची तक्रार
3 मानवी हक्क आयोगाने महाराष्ट्र शासनास फटकारले
Just Now!
X