जम्मू – काश्मीरमधील सोपार येथे आज सकाळपासून दहशतवादी आणि जम्मू – काश्मीर पोलिस दलाच्या जवानांमध्ये चकमक सुरू होती. दहशतवादी  या परिसरात दडून बसला असल्याची माहिती मिळाल्यानंतर, जवानांनी बारामुल्ला जिल्ह्यातील सोपारमधील गुंड ब्राथ भागास वेढा देत परिसरात शोधमोहीम सुरू केली होती.

यावेळी दहशतवाद्याकडून जवानांवर गोळीबार सुरू करण्यात आला. दहशतवाद्याच्या गोळीबारास जवानांकडून सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले. यानंतर घडलेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश आले. विशेष म्हणजे चकमकीच्या ठिकाणाहून मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला आहे. परिसरात शोधमोहीम सुरू आहे.