सध्या संपूर्ण जगाचे लक्ष करोना व्हायरसचा फैलाव रोखणाऱ्या लशीकडे लागले आहे. अमेरिका, ब्रिटन या देशांमध्ये लशी मानवी चाचणीच्या निर्णायक टप्प्यांवर आहेत. अमेरिकेत तर नोव्हेंबरपासन लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होऊ शकते. ट्रम्प प्रशासनाने तशी तयारीच केली आहे.

अमेरिकेत मॉर्डना, पीफायझर या कंपन्यांप्रमाणे जॉन्सन अँड जॉन्सनने करोना व्हायरस विरोधात विकसित केलेल्या लशीची तिसऱ्या फेजची चाचणी सुरु झाली आहे. जॉन्सन अँड जॉन्सनने करोना विरोधात विकसित केलेल्या लशीच्या पहिल्या फेजच्या चाचणीचे निष्कर्ष आता समोर आले आहेत.

लाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमानात स्टोरेज…लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील ‘ही’ मोठी आव्हानं

प्रायोगिक लशीचा सिंगल डोस दिल्यानंतर स्वयंसेवकांमध्ये करोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी मजबूत रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली. जॉन्सन अँड जॉन्सनच्या Ad26.COV2.S लशीचे दोन डोस घेतल्यानंतरही स्वयंसेवकांच्या शरीरावर कुठलेही दुष्परिणाम दिसले नाहीत. रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे.

लस बनवल्यानंतरही भारताचा मार्ग सोपा नाही कारण…

जॉन्सन अँड जॉन्सनने विकसित केलेल्या लशीचे वैशिष्टय म्हणजे करोनापासून रक्षण करण्यासाठी या लशीचा एक डोसही पुरेसा आहे, तेच मॉर्डना, पीफायझर या कंपन्यांनी विकसित केलेल्या लशीचे दोन डोस द्यावे लागणार आहेत.
एकाडोस पुरेसा ठरला, तर वितरणापासून अनेक गोष्टी आणखी सुलभ होऊ शकतात. जॉन्सन अँड जॉन्सनची लस टोचल्यानंतर तरुणाईल ज्या प्रमाणे संरक्षण मिळते, तसेच ज्येष्ठ नागरिकांना या लशीपासून संरक्षण मिळते का? ते अजून स्पष्ट झालेले नाही.

ज्येष्ठ नागरिकांना करोना व्हायरपासून सर्वाधिक धोका आहे. जुलै महिन्यात माकडांवर या लशीचा सिंगल डोस प्रभावी ठरल्यानंतर अमेरिकन सरकारच्या पाठिंब्याने एक हजार तंदुरुस्त स्वयंसेवकांवर लशीची चाचणी करण्यात आली.
कंपनीने या रिझल्टच्या आधारावर बुधवारपासून अंतिम टप्प्याची चाचणी सुरु केली आहे. तिसऱ्या फेजमध्ये ६० हजार स्वयंसेवकांवर लशीची चाचणी करण्यात येईल. वर्षअखेरीस किंवा २०२१ च्या सुरुवातीला तिसऱ्या फेजचे रिझल्ट समोर येतील असे कंपनीने म्हटले आहे. लस दिल्यानंतर २९ दिवसांनी केलेल्या तपासणीत रोगजंतूंपासून पेशींचे रक्षण करणाऱ्या अँटीबॉडीजची निर्मिती झाल्याचे दिसून आले.