सर्वोच्च न्यायालयाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून न्या. एच. एस. दत्तू यांची नेमणूक जवळपास निश्चित झाली आहे. दत्तू यांची नेमणूक करण्याच्या प्रस्तावाची फाईल सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांनी सरकारकडे पाठवली होती त्यावर सोमवारीच निर्णय झाला असून दत्तू हे पुढचे सरन्यायाधीश असतील. पंतप्रधान कार्यालयाने ही फाईल मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवली आहे.
 सध्याचे सरन्यायाधीश लोढा हे या महिन्यात २७ तारखेला निवृत्त होत आहेत.
  दत्तू यांना डिसेंबर २०१५ पर्यंतचा कालावधी मिळणार आहे. मोदी सरकारने न्यायिक नेमणुका विधेयक आणले असताना दत्तू हे सरन्यायाधीशपदाची सूत्रे घेणार आहेत.