ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज काँग्रेसचा राजीनामा  दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते काँग्रेस पक्षात अस्वस्थ होते. आता ट्विटरवर त्यांनी राजीनामा पोस्ट केला आहे. काँग्रेससाठी हा प्रचंड मोठा धक्का मानला जातो आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी राजीनामा देणं काँग्रेसला चांगलंच मागे नेणारं आहे. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे नाराज होते. कमलनाथ यांना मुख्यमंत्रीपद दिलं गेल्याने ही नाराजी उघडपणे समोर आली होती. आज मोदी-शाह यांच्या भेटीनंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. त्यामुळे राज्यसभेवर भाजपातर्फे उमेदवारी आणि त्यानंतर केंद्रात मंत्रिपद अशी ऑफर शिंदे यांना मिळाली असावी अशी शक्यता काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलून दाखवली.

काँग्रेस पक्षात ते प्रचंड अस्वस्थ झाले होते. ज्योतिरादित्य शिंदे हे तरुण नेतृत्व आहे. कायम डावललं गेल्याने शिंदे हे नाराज झाले होते. आता ते पुढे काय करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ज्योतिरादित्य शिंदे स्वतःचा पक्ष काढून भाजपाला पाठिंबा देतात की भाजपात थेट प्रवेश करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मध्यप्रदेशात काँग्रेसची सत्ता आली. ही निवडणूक जिंकण्यात ज्योतिरादित्य शिंदे यांचा सिंहाचा वाटा होता. मात्र सत्ता आल्यानंतर त्यांना डावललं गेल. त्यामुळे नाराज असलेल्या शिंदे यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.

काँग्रेसमध्ये का होती अस्वस्थता?

मध्य प्रदेशात विधानसभेची निवडणूक जिंकल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांना कायमच डावलण्यात आलं

कमलनाथ आणि दिग्विजय सिंग या दोघांनी शिंदे यांच्या निर्णयांना महत्त्व दिलं नाही.

शिंदे यांची नाराजी वाढली कारण डावललं गेल्याची भावना त्यांच्या मनात वाढत गेली

१८ वर्षांपासून काँग्रेसशी ज्योतिरादित्य सिंधिया एकनिष्ठ राहिले मात्र त्यांना अपेक्षित फळ मिळालं नाही

मध्यप्रदेश निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्रीपद हे शिंदे दिलं जाईल अशी चर्चा होती मात्र कमलनाथ मुख्यमंत्री झाले

मध्यप्रदेश काँग्रेसचं अध्यक्षपदही शिंदे यांना मिळालं नाही, कमलनाथ यांनीही ते पदही स्वतःकडे ठेवलं

या सगळ्या अस्वस्थेनंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला राम राम केला आहे. आता ते थेट भाजपात जाणार की वेगळा पक्ष काढून भाजपाला पाठिंबा देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.