राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना गुजरातच्या राज्यपाल पदी नियुक्त केले आहे. तर भाजपाचे ज्येष्ठ नेते कलराज मिश्रा यांना हिमाचल प्रदेशच्या राज्यपाल पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

दोन्ही राज्यपालांच्या नियुक्तीचे आदेश राष्ट्रपतींनी दिले आहेत. दोघांनीही आपल्या राज्यांमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर नियुक्ती प्रभावी होईल. कलराज मिश्रा यांना मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाची स्वतंत्र जबाबदारी देण्यात आली होती. ते उत्तर प्रदेशमधील देवरिया लोकसभा मतदार संघातुन विजयी झाले होते. यंदा त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली नाही. याशिवाय ते तीन वेळा राज्यसभेचे खासदार व लखनऊ मधुन भाजपाचे आमदार देखील राहिलेले आहेत.