News Flash

कमल हासन यांनी घेतली राहुल गांधींची भेट, अनेक मुद्द्यांवर झाली चर्चा

राहुल यांच्या निवासस्थानी जवळपास १ तास ही भेट झाली

(भेटीनंतर राहुल गांधींनी ट्विट केलेला फोटो)

नुकतंच राजकारणात पाऊल ठेवणारे प्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. या दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये तामिळनाडूच्या राजकीय परिस्थितीशिवाय इतर अनेक मुद्दयांवर चर्चा झाली.

राहुल यांच्या निवासस्थानी जवळपास १ तास ही भेट झाली. आम्ही राजकारणावर चर्चा केली, पण तुम्ही जसा विचार करताय तसं काही नाहीये असं हासन भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले. तामिळनाडूमध्ये कॉंग्रेससोबत आघाडीबाबत चर्चा झाली का ? या प्रश्नाचं उत्तर देताना आम्ही याबाबत चर्चा केली नाही, असं उत्तर कमल हासन यांनी दिलं.


कमल हासन यांची भेट घेऊन चांगलं वाटलं, आम्ही तामिळनाडूच्या राजकीय परिस्थितीशिवाय दोन्ही पक्षाशी निगडीत अनेक मुद्दयांवर चर्चा केली. अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी भेटीनंतर दिली. ट्विटरद्वारे त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. तर भेटीसाठी वेळ दिल्याबद्दल कमल हासन यांनीही राहुल गांधींचे आभार मानले. राहुलजी वेळ आणि माहिती दिल्याबद्दल धन्यवाद…दोघांमध्ये झालेली चर्चा तुमच्यासाठीही उपयोगी ठरली असेल अशी मी आशा बाळगतो, अशी प्रतिक्रिया कमल हासन यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2018 11:24 am

Web Title: kamal hassan meet rahul gandhi
Next Stories
1 साईड दिली नाही म्हणून महिलेचा रिक्षा चालकावर गोळीबार
2 धरणे आंदोलनानंतर आजारी पडले केजरीवाल, उपचारासाठी जाणार बंगळुरूला
3 गायींसाठी ‘गौ मंत्रालय’ स्थापन करा, मध्य प्रदेशच्या कॅबिनेट मंत्र्याची मागणी
Just Now!
X