20 January 2021

News Flash

पंजाब, हरयाणा शेतकरी आंदोलन : ‘त्या’ आजींविषयी ट्विट करणं कंगनाच्या अंगलट; सोशल मीडियावर होतेय ट्रोल

ट्रोलिंगनंतर कंगनाने 'ते' ट्विट केलं डिलीट

केंद्र सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. आज या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा चौथा दिवस असून हे शेतकरी दिल्ली सीमेवर निषेध आंदोलन करत आहेत. यामध्येच अभिनेत्री कंगना रणौतचं एक ट्विट चर्चेत आलं असून सोशल मीडियावर ती चांगलीच ट्रोल झाली आहे.

या आंदोलनातील एक आजी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आल्या असून अभिनेत्री कंगना रणौतने त्यांची तुलना शाहीन बाग प्रकरणातील बिलकिस दादी यांच्यासोबत केली आहे. त्यामुळे कंगनावर ट्रोल होण्याची वेळ आली आहे. कंगनाने अलिकडेच या आजींसदर्भातील एक ट्विट शेअर केलं होतं. मात्र, त्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं. सोशल मीडियावर सुरु झालेल्या ट्रोलिंगनंतर कंगनाने तिचं हे ट्विट डिलीट केलं आहे. मात्र, सध्या ट्विटरवर #DaadiSeMaafiMangKangana हा हॅशटॅग चांगलाच व्हायरल झाला आहे.

कंगनाने या आजीसंदर्भात ट्विट केल्यानंतर ते चुकीचं असल्याचं ऑल्ट न्यूजचे प्रतिक सिन्हा यांनी सांगितलं. तसंच त्यात करण्यात आलेले दावेदेखील खोटे आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी कंगनाला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, कंगना कायमच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येत असते. यापूर्वीदेखील कंगनाने अनेकदा ट्रोलर्सला सामोरी गेली आहे. केंद्र सरकारनं कृषी क्षेत्रात सुधारणा करण्याचं जाहीर करत शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) हे कायदे पावसाळी अधिवेशनात मंजूर करून घेतले. राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर कायदे लागूही करण्यात आले आहेत. दरम्यान, केंद्राच्या या कायद्यांना देशातील काही भागातील शेतकऱ्यांकडून विरोध होताना दिसत आहे. विशेषतः पंजाब हरयाणात या कायद्याविरोधात तीव्र पडसाद उमटताना दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2020 4:34 pm

Web Title: kangana ranaut slammed for sharing fake news on shaheen bagh dadi participating in farmers protest ssj 93
Next Stories
1 रोहिंग्यांच्या मुद्द्यावरुन अमित शाहंचं ओवेसींना उत्तर; म्हणाले, “एकदा लिहून द्या, मग मी…”
2 आंदोलक शेतकऱ्यांनी फेटाळला अमित शाहांचा प्रस्ताव; माध्यमांसमोर मांडणार भूमिका
3 तुमची पिढी संपेल पण हैदराबादचं नाव भाग्यनगर होणार नाही; ओवेसींचा हल्लाबोल
Just Now!
X