News Flash

कराची बेकरी बॉम्बने उडवण्याची धमकी

पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत

संग्रहित

कर्नाटकातील बंगळुरु या ठिकाणी असलेली कराची बेकरी बॉम्बने उडवण्याची धमकी फोनद्वारे आल्याची तक्रार या बेकरीच्या मॅनेजरने पोलिसात केली आहे. कराची बेकरी या नावातून कराची हा शब्द वगळावा नाहीतर बॉम्बने ही बेकरी उडवून देऊ अशी धमकी देणारा फोन आल्याचे बेकरी मॅनेजरने पोलिसांना सांगितले. अंडरवर्ल्ड डॉन विकी शेट्टी बोलत असल्याचे या धमकी देणाऱ्याचे नाव असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

कराची बेकरीचे मॅनेजर पी सुकुमार यांनी या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. पुलवामात जैश ए मोहम्मदने हल्ला केला. या हल्ल्यात चाळीस जवान शहीद झाले. या सगळ्याचा बदला घेण्यासाठी भारतही सज्ज आहे. भारतानेही एअर स्ट्राईक करून या सगळ्याला प्रत्युत्तर दिले. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर कराची बेकरीलाही धमक्या येत आहेत. पुलवामा हल्ल्यात जवान शहीद झाले. अशात पाकिस्तानला उत्तर द्या अशी मागणी होत असतानाच कराची बेकरीने त्यांच्या नावातून कराची हे नाव हटवावे अशी मागणी होते आहे. पुलवामात झालेल्या हल्ल्यानंतरही कराची बेकरीला नाव झाकावे लागले होते.

या सगळ्यानंतर कराची बेकरीने फेसबुकवर एक पोस्ट लिहित कराची बेकरी हा देशभक्ती जपणारा ब्रांड आहे. कराची बेकरीची स्थापना 1953 मध्ये झाली होती त्यावेळपासून हे नाव आहे आणि तीच आमची ओळखही झाली आहे आता ते बदलणं शक्य नाही असं म्हटलं आहे. सगळ्या देशवायीसांच्या भावना आम्ही समजू शकतो असंही कराची बेकरीने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हे आवाहन केलं असलं तरीही कराची बेकरी बॉम्बने उडवण्याची धमकी आल्याचे मॅनेजरने सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2019 3:36 am

Web Title: karachi bakery manger gets bomb threat call
Next Stories
1 काश्मीरमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत नाशिकच्या वैमानिकाचा मृत्यू
2 जवानांच्या बलिदानाचे केंद्र सरकारकडून राजकारण
3 पुलवामा हल्ल्याबाबत सुषमा यांची चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा
Just Now!
X