देशात दिवसागणिक करोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. दिवसाला ५० हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. वाढत्या करोना रुग्णामुळे देशात लॉकडाउन घेण्यात आला. करोना व्हायरसमुळे जगभरात मंदीत आली आहे. त्यामुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. व्यवसाय डबघाइला आले. बेरोजगारी वाढली. कंपन्यांनी अनेकांना नोकऱ्यावरुन काढून टाकले. अशा परिस्तितीत नोकरी जाण्याच्या भितीनं दाम्पत्यांनं आपल्या मुलीसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कर्नाटकातील धारवड येथे घडली आहे. करोनामुळे नोकरी गेली तर जगायचं कसं आणि दुसरी मिळणार कशी या भीतीपोटी एकाच कुटुंबातील तीन जणांनी आपलं आयुष्य संपवलं आहे.

करोनाच्या काळात अनेक कामं बंद असल्यामुळे मजूरांची परवड झाली. आर्थिक फटका बसल्यामुळे सगळ्याच क्षेत्रातील मजूरांचे रोजगार गमवले तर काही गमवण्याच्या भीतीत आहेत. कोरोनामुळे आर्थिक संकटांचा सामना करताना नोकरी जाण्याच्या भीतीनं कर्नाटकमधील दाम्पत्यानं आपल्या मुलीला संपवलं आणि नंतर आत्महत्या केली.

आत्महतेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळावर धाव धेतली. घटनास्थळावर पोलिसांना एका सुसाईड नोट मिळाली आहे. दरम्यान तीनही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर तपासाची पुढील दिशा ठरेल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.