कर्नाटकात मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. कर्नाटकात  सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर बी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री म्हणून शुक्रवारी शपथ घेतली. त्यानंतर त्यांना विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी आजपर्यंतची मुदत देण्यात आली होती. जो त्यांनी आवाजी मतदानाने जिंकला आहे. त्यामुळे कर्नाटकात भाजपाचे सरकार कायम झाले आहे. भाजपाकडे १०६ आमदारांचे संख्याबळ आहे. तर काँग्रेस आणि जेडीएसकडे १०० आमदारांचे संख्याबळ आहे. आवाजी मतदानाच्या जोरावर येडियुरप्पांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला.