News Flash

तुम्हाला माझा सलाम ! काश्मिरी नागरिकाने हल्लेखोरांकडून वाचवणाऱ्यांचे मानले आभार

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये काश्मिरी विक्रेत्यांना मारहाण होत असताना स्थानिकांनी मध्यस्थी करत हल्लेखोरांना थांबवलं

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये काश्मिरी विक्रेत्यांना मारहाण होत असताना स्थानिकांनी मध्यस्थी करत हल्लेखोरांना थांबवलं. मध्यस्थी करत आपला बचाव करणाऱ्या या लोकांचे काश्मिरी नागरिकांनी आभार मानले आहेत. काश्मिरी विक्रेत्यांना मारहाण होत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी याप्रकरणी चौघांना अटक केली आहे.

मोहम्मद अफजल नाईक आणि अब्दुल सलाम यांनी आपल्या मदतीसाठी धावणाऱ्या त्या अनोळखी लोकांचे आभार मानले आहेत. ‘हल्लेखोरांना आम्हाला दहशतवादी म्हटलं. तुम्ही येथे फळे विकता आणि तिथे दगडफेक करता असा आरोप करण्यात आला. त्यांनी आमच्याकडे आधार कार्ड मागितलं. आम्ही तेदेखील त्यांना दाखवलं’, अशी माहिती मोहम्मद अफजल नाईक यांनी पोलीस आणि प्रसारमाध्यमांना दिली.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘काही अनोळखी लोक आले आणि त्यांनी आम्हाला वाचवलं. त्यांनीच पोलिसांना माहिती दिली. यानंतर आम्ही तक्रार दाखल केली. आमची मदत करणाऱ्या त्या सर्व लोकांना सलाम आहे’.

लखनऊत काश्मिरी विक्रेत्यांना मारहाण, स्थानिकांनी मध्यस्थी करत केली सुटका

ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाला आम्ही शिक्षा करु. कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही आणि अशा निष्पाप नागरिकांना टार्गेट करण्याचा त्यांना हक्क नाही. निष्पाप काश्मिरी नागरिकांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं वरिष्ठ पोलीस अधिकारी आनंद कुमार यांनी सांगितलं आहे.

काय झालं होतं ?
विक्रेते रस्त्यावर ड्राय फ्रूट विकण्यासाठी बसले असता भगवे कपडे परिधान केलेले दोघेजण अचानक येऊन मारहाण करण्यास सुरुवात करतात. एक हल्लेखोर तर अक्षरक्ष काठीने मारहाण करताना दिसत आहे. यावेळी आरोपी त्यांच्याकडे आधार कार्डदेखील मागतात. येथून लगेच निघून जायचं अशी धमकीही देण्यात आली. याचवेळी काही लोक तिथे येतात आणि मारहाणीचं कारण विचारु लागतात. यावर मारहाण करणारा व्यक्ती हे काश्मीरचे आहेत म्हणून मारहाण करत आहोत असं उत्तर देतो.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल करत एका आरोपीला अटक केली. अटक कऱण्यात आलेल्या आरोपीचं नाव बजरंग सोनकर असून गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्याच्याविरोधात 12 गुन्हे दाखल असून हत्येच्या गुन्ह्यातही आरोपी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2019 5:14 pm

Web Title: kashmir residents thanks people for saving from atackers in lucknow
Next Stories
1 ‘सरकारला प्रश्न विचारण्याचा ट्रेण्ड आलाय’ म्हणणाऱ्या मोदींना नेटकऱ्यांनी सुनावले
2 १८२ मदरसे ताब्यात, १०० दहशतवादी अटकेत : पाकिस्तानची कारवाई
3 राहुल गांधी आता गाढवांचा बादशाह, भाजपा आमदाराची जीभ घसरली
Just Now!
X