News Flash

कझाकिस्तानमध्ये १०० प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं

टेक ऑफ घेताना विमान जवळच्या इमारतीवर आदळलं

फोटो सौजन्य : रॉयटर्स

कझाकिस्तानमध्ये १०० प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे. अल्माटी विमानतळावर टेक ऑफ घेताना जवळ असलेल्या दोन मजली इमारतीवर हे विमान आदळलं. यावेळी विमानात १०० प्रवासी प्रवास करत होते. यापैकी काही प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे. सध्या बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. दरम्यान, या घटनेत १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

टेक ऑफ दरम्यान या विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अल्माटीवरून नूर सुल्तान या ठिकाणी जाताना हे विमान अपघातग्रस्त झालं. रॉयटर्सनुसार या विमानात एकूण ९५ प्रवासी आणि ५ क्रू मेंबर्स होते. स्थानिक वेळेनुसार सकाळी ७ वाजून २२ मिनिटांनी हा अपघात झाला.

टेक ऑफ दरम्यान वैमानिकाचा विमानावरील ताबा सुटला आणि विमान नजिकच्या दोन मजली इमारतीवर जाऊन आदळल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान आपात्कालिन सेवा विमानतळावर दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2019 9:23 am

Web Title: kazakhstan flight crashed emergency services almaty airport jud 87
टॅग : Plane Crash
Next Stories
1 “हिंदूना धमकावणाऱ्यांना पाकिस्तानात पाठवलं जाईल”, भाजपा नेत्याची धमकी
2 एअर इंडिया म्हणते आता उधारी बंद! आधी पैसे, मग प्रवास
3 IAF चा पराक्रमी ‘बहादूर’ आज होणार निवृत्त
Just Now!
X