28 February 2021

News Flash

उबर चालकाने अभिनेत्रीला कॅबमधून ओढून बाहेर काढलं, भररस्त्यात केली गैरवर्तवणूक

"मला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. याआधी माझ्यासोबत असा प्रकार झाला नव्हता"

बंगाली अभिनेत्री स्वस्तिका दत्ता हिने बुधवारी पोलीस ठाण्यात उबर चालकाविरोधात तक्रार दाखल केली. स्वस्तिका दत्ता हिने चालकाने आपल्यासोबत गैरवर्तवणूक केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. घडल्या प्रकाराबद्दल सांगताना चालकाने प्रवासादरम्यान अर्ध्या रस्त्यातच आपल्याला सोडलं असा आरोप स्वस्तिका दत्ताने केला आहे.

“हे माझ्यासोबत खरंच झालं आहे. माझा अपमान करण्यात आला. मला अक्षरश: गाडीतून बाहेर काढण्यात आलं. मी माझ्या घरापासून ते स्टुडिओपर्यंत उबर कॅब बुक केली होती. पण जमशेद नावाच्या चालकाने ठरलेल्या ठिकाणाहून मला पिक अप केल्यानंतर अर्ध्यातच प्रवास थांबवला आणि मला कारमधून खाली उतरवायला लागलं”अशी माहिती स्वस्तिका दत्ता हिने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. स्वस्तिकाने चालकाने फोटो, फोन नंबर आणि नंबर प्लेटचाही फोटो शेअर केला आहे.

पुढे तिने सांगितलं आहे की, “जेव्हा मी नकार दिला तेव्हा चालकाने विरुद्ध दिशेला गाडी नेली आणि आपल्या परिसरात नेऊन गैरवर्तवणूक केली. त्याने गाडीतून खाली उतरत दरवाजा उघडला आणि अक्षरश: मला खेचून बाहेर काढलं. जेव्हा मी संतापले आणि मदतीसाठी आरडाओरड करु लागले तेव्हा त्याने इतर मुलांना बोलावण्याची धमकी दिली”.

“मला शुटिंगसाठी उशीर होत असल्या कारणाने आणि युनिट वाट पाहत असल्याने लवकरात लवकर तिथे पोहोचणं गरजेचं होतं. मी माझ्या वडिलांशी बोलून कायदेशीर कारवाईसंबंधी माहिती घेतली”, असं स्वस्तिका दत्ताने सांगितलं आहे. “माझा छळ करण्यात आला असून, याचा मला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. याआधी माझ्यासोबत असा प्रकार झाला नव्हता”, असंही तिने म्हटलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी चालकाला अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2019 11:29 am

Web Title: kolkata uber cab driver arrested bengali tv actor swastika dutta facebook post sgy 87
Next Stories
1 राम मंदिर वाद : मध्यस्थांच्या अहवालाची वाट पाहू, अन्यथा २५ जुलैपासून सुनावणी
2 कर्नाटक, गोव्यातील राजकीय घडामोडींविरोधात विरोधकांची दिल्लीत निदर्शने
3 ‘विरोधी पक्षाचं काम सोपं असतं’; राहुल गांधी या विधानामुळे झाले ट्रोल
Just Now!
X