पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेलं फिटनेस चॅलेंज कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी झिडकारलं आहे. नरेंद्र मोदी यांनी कुमारस्वामी आणि टेबल टेनिस खेळाडू मनिका बत्रा यांना फिटनेस चॅलेंज दिलं होतं. मात्र आपल्याला राज्याच्या फिटनेसची जास्त चिंता असल्याचं सांगत कुमारस्वामी यांनी मोदींचं चॅलेंज स्विकारण्यास नकार दिला आहे.

कुमारस्वामी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही माझ्या तब्बेतीची काळजी दाखवलीत त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. फिटनेस खूप महत्वाचं आहे. मी रोज योगा-ट्रेडमिल करतो आणि तो माझ्या व्यायामाचा भाग आहे. पण मी माझ्या राज्याच्या विकास, फिटनेसबद्दल जास्त चिंतित आहे आणि त्यासाठी तुमच्या पाठिंब्याची अपेक्षा आहे’.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रिडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांच्या फिटनेस चॅलेंजमध्ये सहभागी होत आपला एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओत पंतप्रधान नरेंद्र मोदी योगा करताना दिसत आहेत. यासोबत नरेंद्र मोदींनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने दिलेले फिटनेस चॅलेंज पूर्ण केलं आहे. विराट कोहलीने राज्यवर्धन सिंह राठोड यांनी दिलेलं चॅलेंज पूर्ण करत पत्नी अनुष्का शर्मा, महेंद्रसिंग धोनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना फिटनेस चॅलेंज दिलं होतं. राज्यवर्धन सिंह राठोड यांनी हम फिट तो इंडिया फिट मोहिम सुरु केली होती. ज्याला सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुमारस्वामी आणि टेबल टेनिस खेळाडू मनिका बत्रा यांच्यासहित ज्यांचं वय ४० पेक्षा अधिक आहे त्या सर्व आयपीएस अधिकाऱ्यांनाही फिटनेस चॅलेंज दिलं आहे,