छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका ‘कुमकुम भाग्य’मध्ये इंदु दादीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री जरीना खान यांचे निधन झाले आहे. वयाच्या ५४व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. जरीना यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

टीव्ही अभिनेत्री श्रुती झाने जरीना यांच्यासोबत फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर अभिनेता शब्बीर अहलुवालिया याने देखील जरीना यांच्यासोबतचा फोटो शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने ‘वो चांदसा रोशन चेहरा’ असे म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sriti Jha (@itisriti) on

अभिनेता अनुराग शर्माने एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत जरीना खान यांचे निधन झाल्याचे सांगितले. ‘त्या खूप चांगल्या अभिनेत्री होत्या. त्या काम करताना उत्साही असायच्या. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात बहुतेक एक स्टंट वुमन म्हणून केली होती. गेल्या महिन्यातच आम्ही एकत्र चित्रीकरण केले होते. त्यावेळी त्यांची प्रकृती ठिक होती. पण आज अचानक त्यांच्या निधनाची बातमी आली’ असे अनुरागने म्हटले.

 

View this post on Instagram

 

Ye chand sa Roshan Chehera

A post shared by Shabir Ahluwalia (@shabirahluwalia) on

जरीना यांनी कुमकुम भाग्य मालिकेशिवाय ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत देखील काम केले आहे. पण कुमकुम भाग्य मालिकेतील इंदु दादीच्या भूमिकेमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वांना दु:ख झाले आहे. अनेकांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.