लंडनचे पहिले मुस्लीम महापौर म्हणून सादिक खान यांचा शपथविधी झाला. त्यांनी विक्रमी मतांनी महापौर पदाच्या लढतीत विजय मिळवला असून हा भीतीवर आशेचा, फुटीरतावादावर एकतेचा विजय असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. खान हे पाकिस्तानातील एका बस चालकाचे पुत्र असून त्यांनी हुजूर पक्षाचे झ्ॉक गोल्डस्मिथ यांचा पराभव केला.
ब्रिटनच्या राजकीय इतिहासात एवढा मोठा विजय कुणाला मिळाला नव्हता. त्यांना ५७ टक्क्य़ांहून अधिक मते मिळाली असून आठ वर्षांनी लंडनमध्ये मजूर पक्षाला यश आले आहे. खान यांचा लंडनचे नवे महापौर म्हणून बहुधर्मीय कार्यक्रमात साउथवार्क कॅथ्रेडल येथे शपथविधी झाला. त्यांना सर्वानी उभे राहून मानवंदना दिली. खान यांना १३१०१४३ मते मिळाली. गोल्डस्मिथ यांना ९९४६१४ मते मिळाली. शुभ सकाळ माझे नाव सादिक खान. लंडनचा महापौर, सर्व लंडनक रांचा महापौर असे त्यांनी महापौर म्हणून पहिली स्वाक्षरी करताना सांगितले. मजूर पक्षाचे लेन लिव्हिंगस्टोन व हुजूर पक्षाचे बोरिस जॉनसन यांच्यानंतर खान हे महापौर झाले आहेत. माझ्यासारखा कुणी लंडनचा महापौर होईल असे वाटले नव्हते. मी तुमचा आभारी आहे. लंडनचा मला अभिमान आहे. हे महान शहर आहे. तुम्ही आशा व विश्वास माझ्या प्रती दाखवला त्याबाबत मी नतमस्तक आहे. मला व माझ्या कुटुंबाला या शहराने ज्या संधी दिल्या त्या प्रत्येक लंडनवासीयालाही मिळाल्या पाहिजेत. प्रतिस्पर्धी उमेदवार गोल्डस्मिथ यांनी खान यांचा संबंध दहशतवादी व्यक्तींशी जोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर खान यांनी टीका केली.

Senior Gandhian Dhirubhai Mehta passed away
ज्येष्ठ गांधीवादी धीरूभाई मेहता यांचे निधन; कस्तुरबा हेल्थ सोसायटी झाली पोरकी
when bjp leader ashish shelar accidently said Sunetra Pawars defeat in Baramati know what happen exactly
Video: …अन् आशिष शेलार म्हणाले, “सुनेत्रा पवारांचा पराभव होणार!”
Loksatta anvyarth Two parties join India from Jammu and Kashmir to fight against BJP Farooq Abdullah National Conference Mehbooba Mufti PDP
अन्वयार्थ: भाजपेतर ‘इंडिया’तील घटकपक्षांच्या टवाळक्या
Buldhana lok sabha
बुलढाणा : नरेंद्र खेडेकर-हर्षवर्धन सपकाळ यांच्यात दिलजमाई; आधी मैत्रीपूर्ण लढतीचे ट्विट आता फक्त मैत्री