काश्मीर प्रश्नावरील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निर्णयाबाबत भाजपाचे लडाख येथील खासदार जामयांग शेरिंग नामग्याल यांनी मत व्यक्त करताना सांगितले की, मी खुप आनंदी आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात निर्णय घेण्यात आला. संयुक्त राष्ट्रात लडाखवर चर्चा करण्यात आली. या अगोदर काँग्रेस सराकार सत्तेत होते तेव्हा लडाखवर संसदेतही चर्चा केली गेली नाही.

तसेच त्यांनी म्हटले की, भारत सरकार आपल्या भागाचा विकास कशाप्रकारे करते हा त्याचा पूर्णतः अंतर्गत विषय आहे. जर शेजाऱ्यांना याची अडचण आहे तर त्याला आम्ही काही करू शकत नाही. लडाख भारताचा अंतर्गत भाग आहे. शिवाय हे एक भारताचे अनमोल रत्न आहे. याची देखरेख कशा करायची आहे, हा भारताचा अंतर्गत विषय आहे.

शिवाय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अणवस्त्र धोरणाबाबतच्या वक्तव्यावर बोलतांना त्यांनी म्हटले की, भारत सरकार जो काही निर्णय घेईल, लडाखची जनता त्या निर्णयाच्या पाठीशी उभी राहील. हे चांगलेच आहे की युद्ध होत नाही, मात्र जर देशाच्या हितासाठी होत असेल तर, लडाखची जनता त्या निर्णयाच्या बाजूनेच असेल.