News Flash

निवडणुका हे काँग्रेस आणि संघामधील महाभारत -चिदंबरम

येणारी लोकसभा निवडणूक हे काँग्रेस आणि मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार निवडणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधील ‘महाभारत युद्ध’ ठरणार आहे

| October 28, 2013 12:55 pm

येणारी लोकसभा निवडणूक हे काँग्रेस आणि मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार निवडणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधील ‘महाभारत युद्ध’ ठरणार आहे, असे वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री चिदंबरम यांनी केले आह़े  शनिवारी रात्री पक्षाने काँग्रेसने येथे आयोजित केलेल्या प्रचारसभेत ते बोलत होत़े
संघ जातीय आधारावर लोकांना विभागून एका वाईट गोष्टीचे बीज रोवण्याचा प्रयत्न करीत आहे, अशी टीकाही त्यांनी या वेळी केली़  गुजरातमध्ये चकमकीत अनेक मुस्लीम युवक मारले गेले आहेत, असा दावा करीत चिदंबरम यांनी सांगितले की, ते गृहमंत्री होते तेव्हा चकमकींना कधीच परवानगी देत नसत़  गुन्हेगार किंवा अतिरेकी गोळीबार करीत नसतील तर त्यांना जिवंतच पकडा, असे आदेश तेव्हा दिल्याचेही त्यांनी सांगितल़े

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2013 12:55 pm

Web Title: ls polls to be mahabharath yudh between cong rss chidambaram
टॅग : Congress,P Chidambaram
Next Stories
1 सीमावर्ती भागात लवकरच भारतीय रेल्वेचे जाळे
2 २६/११ संबंधीचे महत्त्वाचे पुरावे पाकिस्तानला सुपूर्द
3 बांगलादेशातील हिंसाचारात ५ ठार
Just Now!
X