News Flash

दहाव्या लग्नाच्या तयारीत असलेल्या भामट्याला सातव्या पत्नीच्या तक्रारीनंतर अटक

नऊ बायकांशी लग्न करून पुन्हा एकदा दहावे लग्न करण्याच्या तयारीत असलेल्या भामट्याला पोलिसांनी अटक केली आहे.

नऊ बायकांशी लग्न करून पुन्हा एकदा दहावे लग्न करण्याच्या तयारीत असलेल्या भामट्याला पोलिसांनी अटक केली आहे. लखनऊमध्ये ही घटना घडली असून ठाकूरगंज पोलिसांनी या भामट्याला अटक केली आहे. समीर अहमद खान असे या महाभागाचे नाव आहे. मॅट्रिमॉनिअल वेबसाइटवर विवाह इच्छुक स्थळांच्या यादीत समीरने नाव दिले. त्याची नऊ लग्ने झाली आहेत. असे असूनही त्याने दहाव्या बाईसोबत साखरपुडा केला आणि काही दिवसातच तो तिच्याशी लग्न करणार होता. मात्र समीरच्या सातव्या बायकोने केलेल्या तक्रारीनंतर त्याचे बिंग अखेर फुटले आणि पोलिसांनी त्याला अटक केली. टाइम्स नाऊने या संदर्भातले वृत्त दिले आहे. पोलिसांनी या समीरची कसून चौकशी केली असता नऊ लग्ने केल्याची कबुली त्याने दिली.

समीर खानने मॅट्रोमॉनिअल वेबसाइटवर विवाह इच्छुक असल्याची जाहिरात दिली. एका बाईशी त्याची ओळखही झाली. तसेच या दोघांचा साखरपुडाही झाला. समीरच्या सातव्या बायकोच्या भावाने समीरला लखनऊमध्ये राहण्याची विनंती केली होती. त्यानंतर समीर लखनऊमध्येच राहिला. मात्र त्याने त्याच्या बायकोला माझ्या फोनला अजिबात हात लावायचा नाही असे बजावले होते. समीरच्या या इशाऱ्यामुळे त्याच्या बायकोला त्याचा संशय येत होता. एक दिवस तिने संधी साधून समीरचा फोन तपासला. फोन तपासल्यावर तिचा संशय खरा ठरला. समीरचे लग्न झाल्याचे तिला समजले. तिने समीरच्या नवव्या बायकोशी संवाद साधला, त्यानंतर एकामागोमाग एक फोन केल्यानंतर तिला समीरची नऊ लग्ने झाल्याचे स्पष्ट झाले.

यास्मिन नावाच्या एका महिलेनेही समोर येत मी समीरची बायको असल्याचा दावा केला. यास्मिन माझी बायको नाहीच असे म्हणत समीरने कानावर हात ठेवले आणि त्यानंतर यास्मिनला भेटून तिला मारहाण केली. या सगळ्या प्रकारामुळे संतापलेल्या समीरच्या सातव्या बायकोने पोलिसात धाव घेतली. त्यानंतर समीरने एकूण ९ लग्ने केली असून महिलांची फसवणूक केली आणि तो दहाव्या लग्नाच्या तयारीत होता असे समजले आहे.

ठाकूरगंज पोलीस आता यासंदर्भात समीरची कसून चौकशी करत आहेत आणि या सगळ्या प्रकरणाचा बारकाईने तपास करत आहेत. सुरुवातीला समीरने आपली तीन लग्ने झाली असल्याची कबुली दिली. मात्र त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने एकून ९ लग्ने केल्याचे मान्य केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 5:11 am

Web Title: lucknow man attempts tenth marriage arrested after seventh wife files complaint
Next Stories
1 दाऊदची माहिती मिळविण्यात पोलीस अपयशी
2 पत्रकारांकडे दिलेली कबुली सबळ पुरावा
3 चामुंडेश्वरीत जुन्या मित्राशी सिद्धरामैय्या यांची लढत
Just Now!
X