News Flash

दहा वर्षांच्या मुलीवर काकासह तिघांचा वर्षभर सामूहिक बलात्कार

भोपाळमधील साकेतनगर परिसरात १० वर्षांची मुलगी तिच्या काकाच्या घरी राहत होती. तिला आई- वडील नाहीत. गेल्या वर्षभरापासून विकृत काका तिच्यावर अत्याचार करत होता.

संग्रहित छायाचित्र

देशभरात लहान मुलींवर अत्याचाराच्या घटना सुरु असून मध्य प्रदेशमध्येही मन सून्न करणारी घटना घडली आहे. आई- वडील नसल्याने काकाच्या घरी राहणाऱ्या १० वर्षांच्या मुलीवर तिच्याच काकाने आणि सोसायटीतील दोन मुलांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली असून पीडित मुलीने मैत्रिणीकडे रडत रडत हा प्रकार सांगितला आणि नराधमांची रवानगी तुरुंगात झाली.

भोपाळमधील साकेतनगर परिसरात १० वर्षांची मुलगी तिच्या काकाच्या घरी राहत होती. तिला आई- वडील नाहीत. गेल्या वर्षभरापासून विकृत काका तिच्यावर अत्याचार करत होता. यावर कळस म्हणजे एकदा त्याने पीडित मुलीवर सोसायटीच्या आवारातच बलात्कार केला. हा प्रकार सोसायटीतील दोन मुलांनी बघितला. यानंतर त्या मुलांनीही पीडित मुलीला ब्लॅकमेल करुन तिच्यावर बलात्कार केला.  यात एका अल्पवयीन मुलाचा व इंजिनीअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाचा समावेश आहे.

काही दिवसांपूर्वी पीडित मुलीने शाळेतील एका मैत्रिणीला रडत रडत तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराची करुण कहाणी सांगितली आणि या घटनेला वाचा फुटली. या अत्याचारांमुळे मानसिक त्रास सोसावा लागत असल्याचे तिने मैत्रिणीला सांगितले. मैत्रिणीने हा प्रकार तिच्या आईला सांगितला आणि तिच्या आईने तातडीने एका समाजसेवी संस्थेकडे धाव घेतली. समाजसेवी संस्थेने पोलिसांच्या मदतीने पीडित मुलीची त्या घरातून सुटका केली. पोलिसांनी वैद्यकीय तपासणीनंतर पीडित मुलीची रवानगी मुलींच्या वसतीगृहात केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2018 1:24 pm

Web Title: madhya pradesh 10 year old girl gang raped by three including her uncle at saket nagar
Next Stories
1 ‘किमान एक तरी मेला पाहिजे’, स्टरलाइट विरोधी आंदोलनादरम्यान पोलिसाने दिलेला आदेश व्हिडीओत कैद
2 म्यानमारमध्ये रोहिंग्या दहशतवाद्यांकडून ५३ हिंदूंची हत्या: अॅम्नेस्टीचा अहवाल
3 पेट्रोल २५ रूपयांनी स्वस्त होऊ शकते, पी. चिदंबरम यांचा दावा
Just Now!
X