News Flash

मध्य प्रदेशात ट्रॅक्टर उलटून ११ भाविक ठार

भाविकांवर काळाचा घाला

मध्य प्रदेशातील नीमच येथे ट्रॅक्टर ट्रॉली उलटून झालेल्या भीषण अपघातात ११ भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १४ जण जखमी आहेत. मंदसौर जिल्ह्यातून हे भाविक राजस्थानमध्ये देवदर्शनासाठी निघाले होते.

नीमच परिसरात भरधाव ट्रॅक्टरचा चाक पंक्चर झाल्याने तो उलटला. या दुर्घटनेत ११ भाविकांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर स्थानिकांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.

मृतांची नावे:

– मोहनलाल गोवर्धन जाट (वय ३०, रा. खंडेरिया काचर)

– नीलेश घनश्याम बलाई (वय ५)

– दीपक मदनलाल बलाई

– वर्षा श्यामू बलाई (वय ३)

– लोकेश जगदीश लुहार

– मथरी शिवनारायण लुहार (वय ४०)

– भागू रोडिमल बलाई

– भगुडी बलाई

– भंवरी उदयलाल बलाई

– कारी श्यामू बलाई

– मांगू बाई

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2017 8:02 pm

Web Title: madhya pradesh 11 dead 12 injured as tractor trolley carrying pilgrims overturns
Next Stories
1 १०० किलो सोने गायब, दिल्ली विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्याला अटक
2 ‘कोर्ट वॉन्ट्स टू नो’; अर्णब गोस्वामी यांना हायकोर्टाची नोटीस
3 कथित गोरक्षकांचा भाजपशी संबंध जोडणे चुकीचे: नितीन गडकरी
Just Now!
X