News Flash

राजीव हत्या : फेरतपासाची मागणी अमान्य

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणाचा नव्याने तपास करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

| April 18, 2015 02:26 am

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणाचा नव्याने तपास करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
राजीव गांधी यांची हत्या केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आलेले टी. सुदेंथेंदराजा ऊर्फ संथन, व्ही. श्रीहरन ऊर्फ मुरुगन आणि ए. जी. पेरारीवलन यांचा हत्येत सहभाग नव्हता, त्यामुळे या घटनेचा पुन्हा तपास झाल्यास त्यांचे निर्दोषत्व सिद्ध होईल, असे प्रतिपादन व्ही. शांतकुमारेसन या याचिकाकर्त्यां वकिलाने केली होती. या तिघांना पूर्वी सुनावण्यात आलेली मृत्युदंडाची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने जन्मठेपेत परावर्तित केली होती. अशा याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर केल्या जायला हव्यात, असा सल्ला  देऊन मुख्य न्यायाधीश न्या. संजय किशन कौल व न्या. एस. मणिकुमार यांच्या पीठाने ही याचिका फेटाळून लावली.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2015 2:26 am

Web Title: madras hc dismisses plea seeking reinvestigation into rajiv gandhi assassination
टॅग : Rajiv Gandhi
Next Stories
1 आग्रा येथील मनोरुग्णालयात शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ
2 राहुल यांची आज शेतकऱ्यांशी चर्चा
3 मध्य प्रदेशच्या राज्यपालांविरोधातील एफआयआरला अंतरिम स्थगिती
Just Now!
X