राष्ट्रपती राजवट आणि अनेक नाट्यमय घडामोडींनंतर अखेर मालदीवमध्ये सत्ताबदल झाला. गेल्या काही महिन्यांपासून अनेक राजकीय उलथापालथीं सुरु होत्या. अखेर रविवारी त्यावर पडदा पडला. राष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत वर्तमान राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांना पराभवाचा धक्का बसला. महत्वाची बाब म्हणजे या निवडणुकीत अपक्ष उमेदवार इब्राहीम मोहम्मद सोलिह यांनी ऐतिहासिक विजय नोंदवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोलिह हे मालदीवचे भारतासोबत दृढ संबंध असावेत या विचारसरणीचे आहेत. त्यामुळे मालदीवमधील सत्ताबदल हे भारतासाठी चांगले मानले जात आहे. एका संकेतस्थळाच्या माहितीनुसार सोलिह यांना आतापर्यंत झालेल्या मतमोजणीमधील ९२ टक्के मतांपैकी ५८.३ टक्के मते मिळाली आहेत. देशातील निवडणूक प्रक्रियेचे निरीक्षण करणाऱ्या ट्रान्सपरेंसी मालदीव या स्वायत्त संस्थेने सोलिह यांनी निर्णायक मताधिक्याने विजय मिळवल्याचे म्हटले आहे.

विजय मिळवल्यानंतर केलेल्या भाषणात सोलिह यांना हा आनंदाचा क्षण असल्याचे म्हटले. तसेच, हा ऐतिहासिक क्षण असून आता देशात शांततामय मार्गाने सत्ता हस्तांतरण होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maldives opposition leader ibrahim mohamed solih wins presidential elections with upset poll victory
First published on: 24-09-2018 at 06:26 IST