आफ्रिकेतील माली या देशात पुन्हा एकदा राजकीय संकट गहिरं झालं आहे. अंतरिम सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल केल्यानंतर लष्कराने बंडाचा पवित्रा घेतला आहे. बंडखोर लष्कराने राष्ट्रपती बाह दाव, पंतप्रधान मोक्टर यान आणि संरक्षणमंत्री सोलोमेन डोकोर यांना ताब्यात घेतलं आहे. या तिघांना राजधानी बमाकोच्या बाहेर असलेल्या लष्करी मुख्यालयात ठेवलं आहे. लष्कारातील दोन अधिकाऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने लष्काराने हे बंड पुकारलं आहे. त्यामुळे असंतोषाचा वणवा भडकण्याची चिन्हं आहेत.

मालीमध्ये लष्कराने दुसऱ्यांदा बंडखोरी केली आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात लष्कराने बंड पुकारत सत्ता आपल्या ताब्यात घेतली होती. राष्ट्रपती इब्राहिम बाउबकर कीता यांना पदावरून हटवत सत्ता मिळवली होती. त्यानंतर राष्ट्रपती बाह दाव आणि पंतप्रधान मोक्टर यान यांच्याकडे कार्यभार सोपवण्यात आला होता.

बंगाल हिंसाचाराप्रकरणी सुप्रीम कोर्टाचे खडे बोल; नागरिकांच्या पलायनाबाबत मागितलं स्पष्टीकरण

मालीतील राजकीय अस्थिरतेचा फायदा दहशतवादी संघटना घेत असल्याचं मागच्या अनुभवावरून दिसून आलं आहे. अलकायदा आणि इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटना आपली मुळं घट्टपणे इथे रोवताना दिसत आहेत. २०२१ मध्ये राजकीय संकटाचा फायदा घेत अलकायदाच्या दहशतवाद्यांनी मालीतील उत्तरेकडील भाग बळकावला होता. तेव्हापासून या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी फ्रान्सच्या नेतृत्वाखाली हजारो सैनिक तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर संयुक्त राष्ट्र शांती सेनेकडून मालीत जवळपास ८७ कोटी रुपये दरवर्षी खर्च केले जात आहेत. मात्र अजूनही हवं तसं यश मिळताना दिसत नाही. राजकीय अस्थिरता अशीच राहिली तर मोठ्या संख्येनं लोकांचं पलायन होईल अशी भीती यूरोपीयन नेत्यांनी व्यक्त केली आहे.

भारत वेटिंगवर! फायझर, मॉडर्नाच्या लशींची बुकिंग फुल; भारताला करावी लागणार मोठी प्रतीक्षा

लष्काराने ताब्यात घेतलेल्या नेत्यांची सुटका करण्याची मागणी संयुक्त राष्ट्र, यूरोपीयन यूनियन आणि अन्य देशांनी केली आहे. मालीत पुढच्या वर्षी निवडणुका आहेत.