करोनापासून बचाव होण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काही सूचना केल्या आहेत. सध्या सगळा देश हा करोनाच्या संकटाशी लढतोय. अशात ममता बॅनर्जी यांनी काही सूचना केल्या आहेत.

काय म्हटलं आहे ममता बॅनर्जींनी?
घराचे दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवा. असं केल्याने घरामध्ये खेळती हवा राहिल. मी जेव्हा कारने प्रवास करते तेव्हा मी कारच्या खिडक्याही उघड्या ठेवते. एसीचा वापर टाळा. माझ्या घरालाही फारशी दारं किंवा खिडक्या नाहीत. जेव्हा शक्य आहे तेव्हा मी दरवाजे खिडक्या उघडून ठेवते. घरात स्वच्छ सूर्यप्रकाश आणि खेळती हवा असेल तर व्हायरस बाहेर पडेल असंही त्या म्हणाल्या आहेत.

पश्चिम बंगालमधल्या डॉक्टरांनाही त्यांनी एसी वापरण्याऐवजी दवाखान्याचे दरवाजे खिडक्या किमान एक दोन तास उघडे ठेवा असंही ममता बॅनर्जींनी सुचवलं आहे.

सध्या देशभरातील करोनाग्रस्तांची संख्या ७ लाखांच्या वर गेली आहे. महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, दिल्ली या ठिकाणी रुग्ण वाढत आहेत. अशात ममता बॅनर्जी यांनी दरवाजे आणि खिडक्या उघडा अशा सूचना दिल्या आहेत. तसंच डॉक्टरांनीही एसीचा उपयोग करण्याऐवजी दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात असं सुचवलं  आहे.