माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेसच्या नेत्या कुमारी शैलजा यांच्या निवासस्थानी सोमवारी सकाळी एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. संजय (वय ४२) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. कुमारी शैलजा यांच्या निवासस्थानी घरकाम करणाऱया एका महिलेचा तो पती आहे. दिल्लीतील सुनेहरी बाग परिसरात शैलजा यांचे निवासस्थान आहे. निवासस्थानातील कर्मचाऱय़ांच्या खोलीमध्ये हा मृतदेह आढळला. सोमवारी सकाळी दिल्ली पोलीसांना या घटनेबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस लगेचच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी पंचनामा केला. संजय यांचा मृत्यू अनैसर्गिक असून, पोलीस तपास करीत असल्याचे नवी दिल्लीचे अतिरिक्त पोलीस आयुक्त एसबीएस त्यागी यांनी सांगितले.