पत्नीची हत्या करुन पती तिचा मृतदेह स्कूटरवरुन घेऊन चालला होता. गुजरातच्या राजकोटमधील एका गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली. हा प्रकार पाहिल्यानंतर रोहिशालामध्ये रस्त्यावरुन जाणाऱ्या लोकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. रविवारी दिवसाढवळया ही घटना घडली. हे जोडपे सिंधी कॅम्प कॉलनीमध्ये राहते. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
घरगुती भांडणातून पतीने घरातच पत्नीची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह स्कूटरवर ठेवून विल्हेवाट लावण्यासाठी चालला होता. सिंधी कॉलनीतल्या घरापासून रोहिशाळा गावापर्यंत त्याने मृतदेह स्कूटरवरुन नेला. हे अंतर १० किलोमीटर आहे. “स्कूटरचे हँडल आणि पाय ठेवायच्या जागेमध्ये आरोपीने मृतदेह ठेवला होता. मृतदेहाचे पाय संपूर्ण रस्ताभर फरफटत होते. हे भयानक दृश्य पाहिल्यानंतर रस्त्यावरुन जाणाऱ्या वाटसरुंनी आरडा-ओरडा केला, तेव्हा आरोपीने स्कूटर जोरात पळवली. लोकांनी आपल्या गाडीवरुन आरोपीला पाठलाग केला व त्याला पकडले” अशी माहिती पालितानाच्या पोलीस निरीक्षकांनी दिली.
आणखी वाचा- स्वत: विकलेली कार Duplicate Key चा वापर करुन चोरायचा अन् पुन्हा विकायचा
“पालिताना तालुक्यातील रोहिशाळा गावाच्या हद्दी बाहेरच्या जंगलात जाऊन मृतदेहाची विल्हेवाट लावणार होतो असे आरोपीने पोलीस चौकशीत सांगितले” अशी माहिती पोलिसांनी दिली. मागच्यावर्षीच आरोपीचे लग्न झाले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 2, 2020 1:42 pm