06 August 2020

News Flash

पोलिसांच्या वेशात मुलींच्या हॉस्टेलसमोर केले हस्तमैथुन; व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओ व्हायरल झाल्यावर प्रकरण समोर आले

व्हिडिओ व्हायरल झाल्यावर प्रकरण समोर आले

हैदराबादमधील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टीआयएसएस)च्या आवारातील विद्यार्थिनींच्या हॉस्टेलसमोर एका व्यक्तीने हस्तमैथुन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गंभीर्याची बाब म्हणजे या व्यक्तीने पोलीसांचा गणवेश घातला असल्याने पोलिसांपैकीच कोणीतरी हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे. हे प्रकरण चार महिन्यापूर्वीचे असले तरी त्याचा व्हिडिओ आता समोर आल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली आहे.

नक्की काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार रचकोंडा पोलिसांनी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. पोलिसांनी संबंधित हॉस्टेलमधील विद्यार्थीनींची चौकशी करुन त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करुन घेतला आहे. हा प्रकार घडला त्यानंतर संबंधित व्यक्तीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती अशी माहिती आता समोर आली आहे. विद्यार्थ्यींनी दिलेल्या माहितीनुसार २० ऑक्टोबर २०१९ रोजी दुपारी तीन वाजता घडला. या पोलिसांच्या पोषाखात आलेल्या या व्यक्तीने मुलींच्या हॉस्टेलबाहेर रस्त्याच्याकडेला आपली बाईक उभी केली. त्यानंतर तो गाडीवरुन उतरला आणि बाईकच्या बाजूला उभा राहून हॉस्टेलकडे बघून तो हस्तमैथून करु लागला असं विद्यार्थ्यींनी पोलिसांना सांगितले आहे.

व्हिडिओ शूट होत असल्याचं त्याला कळलं तरी…

मुली आपला व्हिडिओ रेकॉर्ड करत आहेत हे समजल्यानंतर त्या व्यक्तीने हस्तमैथुन करणे सुरुच ठेवले. अखेर मुलींनीच मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर त्या व्यक्तीने तेथून पळ काढला. या मुलींनी त्याच्या बाईकचा क्रमांक नोंदवून घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्या बाईकला नंबर प्लेटच नव्हती असंही विद्यार्थीनींनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.

तेव्हा टाळाटाळ आता आली जाग…

नंतर विद्यार्थीनींनी हा प्रकार आपल्या मित्रांना सांगितला. त्यावेळी सर्व विद्यार्थी तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्थानकात गेले असता त्यांची तक्रार दाखल करुन घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्याचा आरोप विद्यार्थीनींनी केला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता चार महिन्यांनी पोलीस खात्याने या प्रकरणाची दखल घेतली आहे.

असले प्रकार नेहमीचेच…

ही घटना घडली त्या हॉस्टेलमध्ये १२० विद्यार्थीनी राहतात. हे हॉस्टेल कॉलेजच्या आवारापासून अर्धा किलोमीटरवर आहे. कॉलेज आणि हॉस्टेलमधील परिसर हा निर्जन आणि झाडाझुडपांचा असल्याने अनेकदा असे प्रकार होत असतात. मात्र यासंदर्भात पोलीस काहीच करत नसल्याचेही विद्यार्थीनींनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2020 8:38 am

Web Title: man masturbates near girls hostel video goes viral scsg 91
Next Stories
1 आंदोलनांमागे कटकारस्थान!
2 भाजपच्या नेत्यांची मुक्ताफळे
3 भाजपच्या नेत्याचे लोकसभेतही वादग्रस्त विधान
Just Now!
X