News Flash

अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या दिशेने बूट भिरकावला, तरूण ताब्यात

बूट भिरकावणारा तरूण ताब्यात

अभिनेत्री तमन्ना भाटिया संग्रहित छायाचित्र

बाहुबली या सिनेमात अवंतिकाचे काम केलेली तमन्ना भाटिया ही अभिनेत्री कोणाला ठाऊक नाही? मात्र आज याच तमन्ना भाटियावर एका माणसाने बूट भिरकावल्याची घटना हैदराबादमध्ये घडली आहे. या माणसाने भिरकावलेला बूट तमन्नाला लागला नाही. मात्र त्याने हा बूट तिलाच फेकून मारला होता. तमन्ना भाटिया सध्या करत असलेले चित्रपट आपल्याला पटत नसल्याने आपण हे केल्याचे बूट भिरकावणाऱ्या माणसाने सांगितले. या घटनेनंतर त्याला तातडीने ताब्यात घेण्यात आले. तमन्ना भाटिया आज हैदराबाद येथील हिमायत नगर भागात एका ज्वेलर्सच्या उद्घाटनासाठी आली होती त्याचवेळी ही घटना घडली.

करीमुल्लाह असे बूट भिरकावणाऱ्या माणसाचे नाव आहे. त्याने मुर्शिदाबादमध्ये बी टेक केले आहे. ज्वेलरी शॉपचे उद्घाटन करण्यासाठी जेव्हा तमन्ना भाटिया त्या दिशेने येत होती तेव्हाच या करीमुल्लाहने तिच्या दिशेने जोरात बूट भिरकावला. हा बूट काही तमन्नाला लागला नाही. मात्र ज्वेलरी शॉपच्या एका कर्मचाऱ्याला मात्र हा बूट लागला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने करीमुल्लाहला ताब्यात घेतले. तसेच त्याने तमन्नाला बूट का मारला याचे कारणही विचारले त्याचवेळी तमन्ना सध्या करत असलेले चित्रपट आणि तिच्या भूमिका आपल्याला पटत नाही. ते चित्रपट पाहून वैतागलो असल्याने आपण तिच्या दिशेने बूट भिरकावला अशी कबुली त्याने दिली.

पोलिसांनी या प्रकरणी करीमुल्लाहच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी ज्वेलरी शॉपच्या कर्मचाऱ्याने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केल्याचीही माहिती समजली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे. तमन्ना भाटिया ही एक नावाजलेली दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. तिने बाहुबलीच्या दोन्ही भागात काम केले आहे. तसेच तेलगु, तामिळ आणि हिंदी सिनेमातही तमन्नाने काम केले आहे. काही जाहिरातीही तिने केल्या आहेत. बाहुबलीतील तिच्या भूमिकेचे कौतुकही झाले होते. मात्र तिच्या भूमिका आणि चित्रपट आवडत नसल्याचे कारण देत तिच्यावर बूट भिरकावण्यात आला. आता याप्रकरणी पोलीस करीमुल्लाहची अधिक चौकशी करत आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2018 9:28 pm

Web Title: man throws footwear at baahubali actress tamannaah says frustrated over her recent films
Next Stories
1 हिंमत असेल तर मोहम्मद पैगंबरांवर सिनेमा काढून दाखवा, गिरीराज सिंह यांचे संजय लीला भन्साळींना आव्हान
2 देशात पहिल्यांदाच जुम्मा नमाजाचे नेतृत्त्व करणाऱ्या जमिदा टीचरना जीवे मारण्याच्या धमक्या
3 गर्जा महाराष्ट्र ! शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक
Just Now!
X