माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांना राजकीय क्षेत्रातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा मनमोहन सिंग यांचा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
२००४ ते २०१४ अशी दहावर्ष मनमोहन सिंग यांनी काँग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचे नेतृत्व केले.

मनमोहन सिंग यांनी आज वयाच्या ८८ व्या वर्षात पदार्पण केले. “डॉ. मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्हाला निरोगी, दीर्घायुष्य लाभो” असे पंतप्रधान मोदींनी आपल्या शुभेच्छा संदेशाच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा- “भारताला त्यांच्यासारख्या पंतप्रधानाची…,” राहुल गांधींकडून मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

देशाचे माजी पंतप्रधान याबरोबरीनेच प्रख्यात अर्थतज्ज्ञ अशीही मनमोहन सिंग यांची ओळख आहे. १९९० च्या दशकात उद्योग, व्यवसायासंबंधी ज्या महत्त्वपूर्ण सुधारणा झाल्या, त्याचे श्रेय मनमोहन सिंग यांना दिले जाते. या सुधारणा कार्यक्रमानेच पुढच्या विकासाचा पाया रचला गेला. दिवंगत पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये तेव्हा, मनमोहन सिंग देशाचे अर्थमंत्री होते.