News Flash

हिंमत असेल तर माझ्याकडे या, दंडुका तयारच; काटजूंचे मनसेला आव्हान

या वक्तव्यावर मनसे काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

markandey katju
मार्कंडेय काटजू तिरुअनंतपुरममध्ये व्याख्यान देण्यासाठी आले होते.

आपल्या ट्विटमुळे नेहमी वादात अडकणारे निवृत्त न्यायमुर्ती मार्कंडेय काटजू हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या वेळी त्यांनी आपला रोख महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर वळवला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी माझ्याकडे यावे. मी दंडुका घेऊन तयारच आहे असे आव्हान त्यांनी दिले आहे. पाकिस्तानी कलाकारांना काम देणाऱ्या भारतीय दिग्दर्शक आणि निर्मात्यांना मनसेने मारण्याची धमकी दिली होती. या पार्श्वभूमीवर काटजू यांनी मनसेला आव्हान दिले आहे.
असहाय्य लोकांवर दादागिरी करून तुम्ही कुठले शौर्य दाखवत आहात? तुमच्यात जर दम असेल तर माझ्याकडे या. मी दंडुका घेऊन तयार आहे असे ट्विट करून त्यांनी मनसेला आव्हानच दिले आहे. उरीवर झालेल्या हल्ल्यानंतर मनसेने पाकिस्तानी कलाकारांना देश सोडण्यास भाग पाडले होते. तसेच पाकिस्तानी कलाकारांना जो निर्माता, दिग्दर्शक चित्रपटात काम देईल त्यालाच मारण्याची धमकी त्यांनी दिली होती. त्यामुळे काटजू यांनी हे टविट् करून मनसेला खुले आव्हान दिले.
काटजू यांच्या या टविट्नंतर अद्याप मनसेची प्रतिक्रिया आलेली नाही. या वक्तव्यावर मनसे काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या आठवड्यात मनसेने मुंबई महापालिकेच्या अभियंत्यांना रस्ते खराब असल्याकारणाने अपमानास्पद वागणूक दिली होती. या अभियंत्यांनी या प्रकरणी न्यायालयात धाव घेतली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2016 7:01 pm

Web Title: markandey katju challenge mns for threatening people
Next Stories
1 यूपीमध्ये मायावतींची सत्ता येणार, मार्कंडेय काटजू यांनी वर्तवले भाकीत
2 गुजरातमध्ये हिंदू आणि मुस्लिम एकत्रपणे बनवतात रावणाचे पुतळे
3 जखमी जवानांच्या पेन्शनमध्ये १८ हजारांनी कपात
Just Now!
X